Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र उपस्थित होते. यावेळी राऊतांनी तुरुंगातील १०५ दिवसांचे अनुभव, नरेंद्र मोदींचे राम मंदिरावरील भाषण आणि मराठी साहित्याच्या उत्सवाबाबत मनमोकळे विचार मांडले.

  • By विवेक
Updated On: Oct 31, 2026 | 08:11 PM
Sanjay Raut book launch

Sanjay Raut book launch

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊतांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन
  • उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर
  • तुरुंगातील १०५ दिवसांबद्दल राऊतांची मिश्किल टिप्पणी
 

मुंबई : शिवसेना खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी त्यांचा अंदाज काहीसा वेगळा पाहायला मिळाला. निमित्त होतं त्यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं! या कार्यक्रमात राऊतांनी साहित्य, अध्यात्म, तुरुंगातील अनुभव आणि राजकीय नेत्यांच्या भाषणांवर दिलखुलास भाष्य केलं. त्यांच्या काही विधानांनी उपस्थितांमध्ये हशाही पिकला. (Sanjay Raut)

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर

राऊत लिखित ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात प्रत्येक पुस्तकाचा उत्सव व्हायला हवा. आपण खाद्यपदार्थांचे आणि कपड्यांचे उत्सव साजरे करतो, मग मराठी साहित्याचाही उत्सव का होऊ नये? मुंबईसारख्या राजधानीच्या शहरात मराठी साहित्यावर चर्चा करण्यासाठी लोक एकत्र येतात, हे दाखवून देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’

‘बोध कीर्तन’ या पुस्तकाच्या नावावरून काहींना संजय राऊत आध्यात्मिक कसे असू शकतात, असा प्रश्न पडू शकतो, असं म्हणत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. उत्तम वक्ता हा उत्तम कीर्तनकार असावा लागतो. वक्त्याकडे सांगण्यासारखं काही असेल, तरच त्याचं कीर्तन प्रभावी ठरतं, असं ते म्हणाले.

तुरुंगातील १०५ दिवसांच्या अनुभवाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, त्यामुळे उत्तम साहित्य निर्माण होईल.” त्यांच्या या विधानाने कार्यक्रमात हशा पिकला. सावरकर, टिळक आणि इतर लेखकांच्या तुरुंगातील साहित्यनिर्मितीचाही त्यांनी उल्लेख केला.

मोदींच्या भाषणाचा पुस्तकात समावेश

राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी केलेल्या भाषणाचाही उल्लेख केला. तुरुंगात असताना हे भाषण ऐकून आपण लिहून काढल्याचं त्यांनी सांगितलं. टेलिप्रॉम्प्टरशिवाय केलेलं ते उत्स्फूर्त आणि अराजकीय भाषण आपल्याला आवडलं, त्यामुळे त्याचा पुस्तकात समावेश केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

साहित्यिक मित्रांच्या संवादातून पुस्तकाची निर्मिती

आपल्यालाही भावना आहेत, कविता आवडतात आणि साहित्यिकांशी संवाद साधायला आवडतं, असं राऊत म्हणाले. प्रसिद्ध कवी ग्रेस हे ‘सामना’ येथील त्यांच्या केबिनमध्ये तासन्तास बसायचे. अशा अनेक साहित्यिक मित्रांसोबत झालेल्या संवादातून ‘बोध कीर्तन’ आकाराला आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकाशन सोहळ्यामुळे संजय राऊतांचा साहित्यिक आणि वैयक्तिक अनुभवांचा वेगळाच पैलू समोर आला.

संजय गायकवाडांच्या पुतळ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके! युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, २४ तासांत माफीचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय राऊत यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे?

    Ans: संजय राऊत यांच्या पुस्तकाचे नाव 'बोध कीर्तन' असे आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

  • Que: 'बोध कीर्तन' पुस्तक प्रकाशनाला कोण उपस्थित होते?

    Ans: या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र उपस्थित होते.

  • Que: तुरुंगातील अनुभवाबद्दल संजय राऊत काय म्हणाले?

    Ans: तुरुंगात घालवलेल्या १०५ दिवसांचा उल्लेख करताना अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, त्यामुळे उत्तम साहित्य निर्माण होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

Web Title: Sanjay raut bodh kirtan book launch uddhav thackeray raj thackeray vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • raj thackeray
  • sanjay raut
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’; उद्धव ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर संजय राऊतांचं मोठं विधान!
1

Sanjay Raut : ‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’; उद्धव ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर संजय राऊतांचं मोठं विधान!

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान
2

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
3

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
4

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.