Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray on Sanjay Raut : ‘बाळासाहेबांनी मुलाखतीतच शिव्या दिल्या, तरी राऊतांनी छापल्या,’ राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!

Raj Thackeray on Sanjay Raut : संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या शिव्याही संजय राऊत यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर बाळासाहेबांनी 'बंदे में दम है' अशी प्रतिक्रिया दिल्याचा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.

  • By विवेक
Updated On: Oct 31, 2026 | 09:15 PM
Raj Thackeray on Sanjay Raut

Raj Thackeray on Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • ‘बोध कीर्तन’ पुस्तक प्रकाशनाला राज ठाकरे यांची उपस्थिती
  • संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्या जुन्या मैत्रीचे किस्से
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा राज ठाकरेंनी सांगितला किस्सा
 

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. (Raj Thackeray on Sanjay Raut)

राज ठाकरे यांनी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा किस्सा सांगितला. संजय राऊतांच्या पत्रकारितेतील धाडसाचं कौतुकदेखील राज ठाकरे यांनी केलं.

संजय राऊत आणि राज ठाकरेंची जुनी मैत्री

राज ठाकरे म्हणाले की, संजय राऊत यांच्यासोबतचे आपले संबंध खूप जुने आहेत. दिलीप ठाकूर आणि संजय राऊत हे आपल्या वडिलांकडे तासन्तास बसायचे. एवढंच नाही, तर त्यांनी वडिलांच्या शिव्याही खाल्ल्या आहेत. संजय राऊत यांचा पहिला संबंध आपल्या वडिलांशी आला आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आला, असं राज यांनी सांगितलं.

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन

बाळासाहेबांच्या मुलाखतीत नेमकं काय घडलं?

१९८६ ते १९८८ या काळात राज ठाकरे ‘मार्मिक’साठी व्यंगचित्र काढत होते. त्यावेळी संजय राऊत ‘लोकप्रभा’मध्ये काम करत होते आणि गँगवॉरवरील कथा लिहिण्यासाठी ओळखले जात होते. याच काळात संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची ‘लोकप्रभा’साठी मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी राज ठाकरेंना विचारणा केली. राज यांनीही त्यांना मुलाखतीसाठी मदत केली. मात्र, मुलाखतीदरम्यान राऊतांनी बाळासाहेबांना काही वेडेवाकडे प्रश्न विचारले. त्यावर बाळासाहेबांनी त्यांना चांगल्याच शिव्या दिल्या. विशेष म्हणजे, राऊतांनी मुलाखत प्रसिद्ध करताना त्या शिव्याही काढून टाकल्या नाहीत.

मुलाखत शिव्यांसह प्रसिद्ध झाल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांच्याबद्दल ‘बंदे में दम है’ अशी भावना व्यक्त केली होती, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला. पुढे १९९२ मध्ये राज ठाकरेंनी बाळासाहेबांना संजय राऊत चांगलं लिहितात, असं सांगितलं. त्याच वर्षी राऊत ‘सामना’चे संपादक झाले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

‘बोधनकरांपासून बोध कीर्तनापर्यंतचा प्रवास’

संजय राऊत यांच्या पत्रकारितेपासून सुरू झालेला प्रवास आज पुस्तक प्रकाशनापर्यंत पोहोचला आहे. ‘बोधनकरांपासून सुरू झालेला प्रवास बोध कीर्तनापर्यंत येईल, असं वाटलं नव्हतं,’ अशी मिश्किल टिप्पणी करत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' पुस्तक प्रकाशनाला कोण उपस्थित होते?

    Ans: या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लेखक अंबरिश मिश्र यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

  • Que: बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत राज ठाकरेंनी कोणता किस्सा सांगितला?

    Ans: संजय राऊत यांनी बाळासाहेबांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी दिलेल्या शिव्याही राऊतांनी मुलाखतीत प्रसिद्ध केल्या होत्या, अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

  • Que: संजय राऊत 'सामना'चे संपादक कधी झाले?

    Ans: राज ठाकरे यांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, १९९२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांची 'सामना'च्या संपादकपदी नियुक्ती केली.

Web Title: Raj thackeray on sanjay raut old memories balasaheb interview bodh kirtan vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • raj thackeray
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन
1

Sanjay Raut : ‘अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे’; संजय राऊतांची फटकेबाजी, ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन

Sanjay Raut : ‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’; उद्धव ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर संजय राऊतांचं मोठं विधान!
2

Sanjay Raut : ‘भविष्यात काय होईल सांगता येत नाही’; उद्धव ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर संजय राऊतांचं मोठं विधान!

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
3

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
4

फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा भन्नाट किस्सा सांगत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.