Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह, पार्थ पवारांनी घेतली फडणवीसांची भेट

राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल (१६ मे) रात्री उशिरा पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरीही या भेटीमुळे राजकीय वातावरणात चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • By विवेक
Updated On: May 17, 2026 | 02:41 PM
Parth Pawar meets CM Devendra Fadnavis, Internal rift in NCP, Prafull Patel, Sunil Tatkare,

Parth Pawar meets CM Devendra Fadnavis, Internal rift in NCP, Prafull Patel, Sunil Tatkare,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
  • गेल्या काही दिवसांपासून राष्ट्र्वादि काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह
  • प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याने नाराजीनाट्याला सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्र्वादि काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरु असल्याचे दिसत आहे. पक्षातील एकूण नाराजीनाट्य संपण्याची अजूनतरी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी पक्षातील घडामोडी या झपाट्याने बदलत असल्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षातील पदावरून पक्षात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल (१६ मे) रात्री उशिरा पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरीही या भेटीमुळे राजकीय वातावरणात चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची मानली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याने या नाराजीनाट्याला सुरुवात झाली. यानंतर पक्षाकडून याबाबत स्पष्टीकरण देत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणी यादीत नसणे हि प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाला नव्या कार्यकारिणी यादीबाबत लवकरच पत्र पाठवले जाईल असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही हि खरंच एक प्रिंटिंग मिस्टेक होती कि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेला अप्रत्यक्ष संदेश होता याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. अश्यातच पार्थ पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी पक्षात काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानाच्या भेटीनंर पुढे काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्षातील नाराजीनाट्यावरून अद्याप काही प्रतिक्रिया फिली नसली तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार पटेल आणि तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. “अजित पवार यांनी शेवटच्या चार महिन्यांत माझ्याशी बोलताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीतील २२ आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तटकरे आणि पटेल यांच्या कामाचे आणि अनुभवाचे कौतुक केले होते. आता पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरणात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

NEET Paper leak Case: धर्मेंद्र प्रधान यांना त्वरित पदावरून हटवा, NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी यांची मागणी

Web Title: Parth pawar meets cm devendra fadanavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devendra Fadanvis
  • parth pawar

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
1

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
2

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रशांत किशोरांची एन्ट्री? सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट, नव्या रणनीतीची चर्चा
3

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रशांत किशोरांची एन्ट्री? सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट, नव्या रणनीतीची चर्चा

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा बैठकीत निर्देश
4

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा बैठकीत निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.