Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वावर जनतेचा विश्वास’; शिवेंद्रसिंहराजेंचं विधान

मतदारांनी खांदेपालट करत नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने नगरपालिकेची सत्ता भाजपकडे देण्याची योग्य वेळ आली आहे. रहिमतपूर पालिका ही भाजपच्या विचारांची बनवा, पालिकेवर भाजपच्या विचारांचा झेंडा फडकवा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 29, 2025 | 12:15 PM
भाजपच्या उमेदवारांना मताधिक्याने विजयी करावे : शिवेंद्रसिंहराजे भोसले

भाजपच्या उमेदवारांना मताधिक्याने विजयी करावे : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी व महिलांच्या विकासासाठी भाजपने राबविलेल्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचल्या आहेत. देशात विकासाचे नवे पर्व सुरु आहे. रहिमतपूर पालिकेवर 25 वर्षे राष्ट्रवादीच्या विचारांची सत्ता होती. संधी मिळूनही त्यांना रहिमतपूरचा सर्वांगीण विकास करता आला नाही, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

रहिमतपूर शहरात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. पालिकेत परिवर्तन अटळ असून, जनतेने या परिवर्तनाचे साक्षीदार व्हावे. रहिमतपूरच्या चौफेर विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी चौकात आयोजित केलेल्या विराट सभेत ते बोलत होते.

हेदेखील वाचा : NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार

यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मनोज घोरपडे, निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, सुनील काटकर, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने-कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, ही विराट सभा म्हणजे चित्रलेखा माने-कदम, संपतराव माने, निलेश माने यांच्या ताकदीचे प्रतीक आहे. जनता आता नगरपालिकेत परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही. गेली 25 वर्षे सत्ताधाऱ्यांनी जनतेला आमिषे दाखवली. आता जनता सुज्ञ झाली आहे. त्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडणार नाही.

मतदारांनी नवीन लोकांना संधी द्यावी

मतदारांनी खांदेपालट करत नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने नगरपालिकेची सत्ता भाजपकडे देण्याची योग्य वेळ आली आहे. रहिमतपूर पालिका ही भाजपच्या विचारांची बनवा, पालिकेवर भाजपच्या विचारांचा झेंडा फडकवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे निधीची चिंता करु नका. शहराच्या सर्वांगीण विकासकामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही.

प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भाजप पाठीशी

प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या भाजप पाठीशी ठामपणे उभा राहतो. योग्यवेळी योग्य न्याय देतो. आपण सर्वांनी या निवडणुकीत एकसंघपणे काम करावे. निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल पक्ष घेत असतो. चित्रलेखा माने-कदम यांना राज्यातील मोठ्या पदावर नेण्याची जबाबदारी आमची असणार आहे. ती आपणास नजीकच्या काळात कळेल. लोकसभेला, विधानसभेला आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले. म्हणूनच आपण यशस्वी झालो. रहिमतपूर शहराचा नियोजनबद्ध कारभार करण्यासाठी, प्रगतीसाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेदेखील वाचा : Sindhudurg : सिंधुदुर्ग निवडणूक वाद: निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव?

Web Title: People have faith in the capable leadership of pm narendra modi and cm devendra fadnavis says minister shivendrasinh raje

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • Local Body Election
  • Maharashtra Politics
  • Shivendrasinh Bhosale

संबंधित बातम्या

राज्यात महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण; आज जाहीर केले जाणार निकाल
1

राज्यात महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान पूर्ण; आज जाहीर केले जाणार निकाल

Maharashtra Politics: “… तर पोलिस ठोकून काढतील”; ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’वरून फडणवीस संतापले
2

Maharashtra Politics: “… तर पोलिस ठोकून काढतील”; ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’वरून फडणवीस संतापले

Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला
3

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Maharashtra Politics: “टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंगरूममधून…”: उद्धव ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप
4

Maharashtra Politics: “टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंगरूममधून…”: उद्धव ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.