Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल डिझेलची भाववाढ सुरूच, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश

देशभरातल्या वाढत्या इंधन दरांमुळे सध्या नागरिकांमधे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने राज्यात सध्या बिकट परिस्थितीव निर्माण झाला आहे.

  • By विवेक
Updated On: May 23, 2026 | 02:52 PM
Devendraa Fadnavis on Petrol Diesel price hike

Devendraa Fadnavis on Petrol Diesel price hike

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या इंधन दरांमुळे सध्या नागरिकांमधे तणावाचे वातावरण, ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर मोठी गर्दी
  • शेतकऱ्यांना पेरणीसाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याचे चित्र
  • मुख्यमांत्री देवेंद्र फडणवीस यांचे पेट्रोल डिझेल टंचाईबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश
देशभरातल्या वाढत्या इंधन दरांमुळे सध्या नागरिकांमधे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने राज्यात सध्या बिकट परिस्थितीव निर्माण झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात नागरिक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी करताना दिसत असून नागरिकांनी पेट्रोल – डिझेल घेण्यासाठी हातात कॅन बाटल्या घेऊनं गर्दी केली आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचा खप अचानक वाढल्याचे दिसत आहे. राज्यातही हिंगोली, परभणी, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. विशेषकरून शेतकऱ्यांना पेरणीसाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. यावरून आता मुख्यमांत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलत पेट्रोल डिझेल टंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार, २२ मे) शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांना जे काही डिझेल लागेल ते ते उपलब्ध करवून द्या असे आदेश मी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कारण काही भागात डिझेलची मागणी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अश्याप्रकारे डिझेलची मागणी अचानक वाढत असेल तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. शेतकऱयांना त्रास होऊ नये यासाठी मी उपाययोजना करायला सांगितले आहे. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरसी बुक बघून त्यांना डिझेल देणे सुरु केले आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

पेट्रोल पंपावर लोकांची झुंबड, व्हायरल व्हिडियोवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडियो तुफान व्हायरल होत असून भारतातील इंधन टंचाईचे भीषण वास्तव यातून समोर येताना दिसत आहे. बुलढाण्यात लोणार येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याची व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोत शेकडो लोक हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपच्या दिशेने पळत असल्याचे दिसत आहे. आता या व्हिडियोवरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली आहे. लवकरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होणार आहे. याआधी शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे. मात्र पेरणीसाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल उपलबध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

“भाजपाने वोटचोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली, मतदारयादीत घोळ करणा-यांना जेलमध्ये जावे लागेल,” – हर्षवर्धन सपकाळ

Web Title: Petrol diesel hike in maharasahtra cm devendra fadnavis strict orders to district administraation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Diesel Petrol Price

संबंधित बातम्या

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
1

ड्रग्जविरोधी लढ्याला बळ! ‘कॅम्पस कनेक्ट’चा शुभारंभ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर
2

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
3

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव
4

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.