पेट्रोल पंपावर लोकांची झुंबड, व्हायरल व्हिडियोवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडियो तुफान व्हायरल होत असून भारतातील इंधन टंचाईचे भीषण वास्तव यातून समोर येताना दिसत आहे. बुलढाण्यात लोणार येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याची व्हिडियो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडियोत शेकडो लोक हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपच्या दिशेने पळत असल्याचे दिसत आहे. आता या व्हिडियोवरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आपल्या ‘X’ अकाऊंटवरून हा व्हिडियो शेअर करत त्या म्हणाल्या, “बुलडाण्यातील लोणार मधील प्रेट्रोल पंपावर लोकांची इंधनासाठी झुंबड उडाली. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर तेलसाठा नाही. इंधन दरवाढ आणि तुटवड्यामुळे राज्यात आणिबाणीची स्थिती उद्भवलेली आहे. परिस्थिती नाजूक झालेली आहे. आज सरकारच्या नाकर्तेपणामुळे खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतीच्या मेहनतीची कामे करण्याचे संकट शेतकरी वर्गावर आहे. सर्वसामान्य लोक, वाहतूकदार सर्वांना सरकारने नाडलेले आहे. सरकारने जबाबदारी घेऊन तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, आता लोकांची “मन की बात” ऐका!” असे त्या म्हणाल्या.
बुलडाण्यातील लोणार मधील प्रेट्रोल पंपावर लोकांची इंधनासाठी झुंबड उडाली. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर तेलसाठा नाही. इंधन दरवाढ आणि तुटवड्यामुळे राज्यात आणिबाणीची स्थिती उद्भवलेली आहे. परिस्थिती नाजूक झालेली आहे. आज सरकारच्या नाकर्तेपणामुळे खरीप हंगाम तोंडावर असल्याने… pic.twitter.com/m4CXIfbrNJ — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) May 22, 2026
शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या. आपल्या ‘X’ अकाऊंटवरून ते म्हणाले, “खाते उघडणी, केवायसी, योजना आणि आता थेट डिझेल… जनतेला आणि शेतकऱ्याला २४ तास रांगेत सडवून छळण्यात या सरकारला कोणता असुरी आनंद मिळतोय? ‘अतिरिक्त खरेदी होतेय’ असले गुळगुळीत आणि निर्लज्ज बहाणे आता बंद करा. मुबलक इंधन मिळत असतं, तर ऐन हंगामात उन्हाळी खर्डा सोडून रस्त्यावर जीवघेणी पळापळ करायला बळीराजाला वेड लागलेले नाही! तुमचे ते विमाने फिरवून केलेले परदेश दौरे, डिजिटल इंडियाचे पोकळ ज्ञान आणि प्रत्यक्ष मैदानात पेट्रोल पंपांची केलेली ही ‘छळछावणी’… हाच का तुमचा मास्टरस्ट्रोक?” असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला विचारला.
स्थळ: लोणार (जि. बुलढाणा) खाते उघडणी, केवायसी, योजना आणि आता थेट डिझेल… जनतेला आणि शेतकऱ्याला २४ तास रांगेत सडवून छळण्यात या सरकारला कोणता असुरी आनंद मिळतोय? ‘अतिरिक्त खरेदी होतेय’ असले गुळगुळीत आणि निर्लज्ज बहाणे आता बंद करा. मुबलक इंधन मिळत असतं, तर ऐन हंगामात उन्हाळी खर्डा… pic.twitter.com/5C968Ckgom — Ambadas Danve (@iambadasdanve) May 21, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले, “या सरकारने राज्यातील शेतकऱ्याला तडफडून मारायचं ठरवलंय की काय, अशी शंका येते. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश करतोय पण सरकारला तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही. आधीच दुष्काळाचं सावट आहे आणि त्याला कसं तोंड देणार असा प्रश्न असतानाच आता खरीपाच्या तयारीसाठी ट्रॅक्टरला डिझेलही मिळत नाही. पेट्रोल पंपावर शेकडोच्या रांगा लागल्या असून टँकर आल्यावर तर डिझेलसाठी चेंगराचेंगरी होतेय. शेतकऱ्याला काय झुरळासारखं चेंगरून मारण्याचा तर हा डाव नाही ना? हेच का अच्छे दिन?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या सरकारने राज्यातील शेतकऱ्याला तडफडून मारायचं ठरवलंय की काय, अशी शंका येते. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश करतोय पण सरकारला तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही. आधीच दुष्काळाचं सावट आहे आणि त्याला कसं तोंड देणार असा प्रश्न असतानाच आता खरीपाच्या तयारीसाठी ट्रॅक्टरला डिझेलही मिळत… pic.twitter.com/jXQTIrkrSc — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2026






