Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Tendulkar : सचिनच्या पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास! वानखेडेवर ‘बॅटोग्राफी’तून ऐतिहासिक बॅट पाहण्याची संधी

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांच्या 35 वर्षांच्या क्रिकेट प्रवासातील 25 ऐतिहासिक बॅट्ससह वैयक्तिक स्मृतिचिन्हांचे ‘बॅटोग्राफी’ दालन वानखेडे स्टेडियमवरील एमसीए संग्रहालयात सुरू करण्यात आले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 17, 2026 | 05:19 PM
Sachin Tendulkar : सचिनच्या पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास! वानखेडेवर 'बॅटोग्राफी'तून ऐतिहासिक बॅट पाहण्याची संधी

Sachin Tendulkar : सचिनच्या पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास! वानखेडेवर 'बॅटोग्राफी'तून ऐतिहासिक बॅट पाहण्याची संधी

Follow Us
Follow Us:
  • पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास
  • हेल्मेट, जर्सी आणि निरोपाच्या भाषणाची आठवणही जपली
  • संग्रहालयाला 23 हजारांहून अधिक पर्यटकांची भेट
 

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सचिनच्या तब्बल 35 वर्षांच्या क्रिकेट प्रवासातील अविस्मरणीय आठवणी आता एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) वानखेडे स्टेडियमवरील एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात सचिन यांना समर्पित ‘बॅटोग्राफी’ या विशेष दालनाचे अनावरण केले आहे.
या दालनात सचिन यांच्या कारकिर्दीतील 25 ऐतिहासिक बॅट्स आणि त्यांच्या वैयक्तिक संग्रहातील अनेक महत्त्वाच्या वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

16 नोव्हेंबर 2026 रोजी सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक उपस्थित होते. विशेष म्हणजे, याच दिवशी सचिन यांच्या वानखेडे स्टेडियमवरील अखेरच्या आणि 200व्या कसोटी सामन्याला 13 वर्षे पूर्ण झाली.

पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास

या दालनातील सर्वात खास बाब म्हणजे सचिन यांच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात करणारी पहिली बॅट ते अखेरच्या आंतरराष्ट्रीय कसोटी डावात वापरलेली बॅट येथे पाहायला मिळणार आहे. 1978 मध्ये वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मोठी बहीण सविता यांनी भेट दिलेल्या काश्मीर विलोच्या बॅटपासून या संग्रहाची सुरुवात होते.

याशिवाय 1990 मध्ये मँचेस्टर येथे पहिले कसोटी शतक झळकावताना वापरलेली बॅट, 1998 मध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी भेट दिलेली बॅट आणि 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत वापरलेली बॅटही येथे ठेवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, 16 मार्च 2012 रोजी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऐतिहासिक 100 वे शतक झळकावताना सचिन यांनी वापरलेली बॅटदेखील या दालनाचे आकर्षण ठरणार आहे.

Sandpaper Gate Controversy : सँडपेपरगेट वाद पुन्हा पेटला! ऑस्ट्रेलियन संघात अजूनही फूट? आर. अश्विनने मांडले धक्कादायक निरीक्षण

हेल्मेट, जर्सी आणि निरोपाच्या भाषणाची आठवणही जपली

केवळ बॅट्सच नव्हे, तर सचिन यांच्या कारकिर्दीशी संबंधित अनेक आठवणींचा ठेवा या दालनात जतन करण्यात आला आहे. त्यांचे पहिले हेल्मेट, मुंबई रणजी संघाची जर्सी, 200व्या कसोटीतील भारतीय संघाची जर्सी आणि हेल्मेट यांचा त्यात समावेश आहे. वानखेडेवर निरोपाचे भाषण करताना त्यांनी संदर्भासाठी वापरलेले कागदाचे पानही येथे पाहायला मिळणार आहे.

या प्रसंगी सचिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, 24 वर्षे त्यांचे आयुष्य 22 यार्डच्या खेळपट्टीभोवती फिरत होते. प्रत्येक बॅटसोबत ड्रेसिंग रूम, खेळपट्टी आणि चाहत्यांच्या जल्लोषाच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत. ज्या वानखेडेवर त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, त्याच ठिकाणी या सर्व बॅट्स एकत्र पाहणे हा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

IND Vs PAK: पाकिस्तान सावधान! India A चे ‘हे’ स्फोटक खेळाडू भिडण्यासाठी सज्ज; कधी होणार सामना?

संग्रहालयाला 23 हजारांहून अधिक पर्यटकांची भेट

एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, संग्रहालय आणि वानखेडे स्टेडियम दौऱ्याला वर्षभरात 23 हजारांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात आता ‘बॅटोग्राफी’ दालनाची भर पडली आहे.

सचिन यांच्या या ऐतिहासिक आठवणी पाहण्यासाठी संग्रहालय आणि स्टेडियम दौऱ्याची तिकिटे 17 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीसाठी डिस्ट्रिक्ट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. या तिकिटांमध्ये नव्या ‘बॅटोग्राफी’ दालनाचा समावेश करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सचिन तेंडुलकर यांच्या ‘बॅटोग्राफी’ दालनाचे उद्घाटन कुठे करण्यात आले?

    Ans: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

  • Que: ‘बॅटोग्राफी’ दालनात सचिन यांच्या किती बॅट्स ठेवण्यात आल्या आहेत?

    Ans: सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील २५ ऐतिहासिक बॅट्स या दालनात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

  • Que: सचिन यांच्या कोणत्या ऐतिहासिक बॅट्स या दालनात पाहायला मिळतील?

    Ans: पहिली काश्मीर विलो बॅट, पहिले कसोटी शतक झळकावतानाची बॅट, डॉन ब्रॅडमन यांनी भेट दिलेली बॅट, 2003 विश्वचषकातील बॅट आणि 100 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावतानाची बॅट येथे पाहायला मिळेल.

Web Title: Sachin tendulkar batography gallery wankhede stadium mca museum rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • MCA
  • MP Sharad pawar
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात
1

Inter Hospital Cricket Tournament : रुग्णालयांच्या मैदानात क्रिकेटचा महासंग्राम; 16 नामांकित रुग्णालयांचे संघ एलिट आणि प्लेट गटात

Womens County Cricket : ठाण्याच्या धनश्रीची इंग्लंडमध्ये भरारी! महिला काउंटी क्रिकेटसाठी झाली निवड
2

Womens County Cricket : ठाण्याच्या धनश्रीची इंग्लंडमध्ये भरारी! महिला काउंटी क्रिकेटसाठी झाली निवड

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral
3

मुंबईच्या गल्लीत सचिनसोबत ब्रिटनच्या विल्यम-केट खेळले क्रिकेट; कुल्हडचा चहा अन्…; Video Viral

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी
4

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.