सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची शिवसेनेची मागणी (फोटो - सोशल मीडिया)
“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमानजनक उल्लेख करणारे पुस्तक बाळासाहेब ठाकरे हयात असते तर महाराष्ट्रात येऊच दिले नसते. मात्र अशी भूमिका उद्धव ठाकरे घेतील का, असा सवाल परांजपे यांनी यावेळी केला. सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी शिवसेनेकडून बुधवारी मुंबईत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पाने फाडून निषेध करण्यात आला. सावरकरांचा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही अपमान केला तर शिवसेना खपवून घेणार नाही.”
“सावरकरांविषयी प्रेम असले तर उबाठा गट दिल्लीत सोनिया गांधी यांच्या घरासमोर निषेध आंदोलन करतील का, त्यांना पान क्रमांक २०१ आणि ४४३ मधील सावरकरांचा केलेला अवमान मान्य आहे का, राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान उबाठाला मान्य आहे का, असे खरमरीत सवाल परांजपे यांनी यावेळी उपस्थित केले. बाळासाहेबांचे संस्कार आणि हिंदुत्व विसरलो म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे,” असे परांजपे म्हणाले.
परांजपे पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी आणि राजकारणासाठी बाळासाहेबांचा वापर केला तर एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहेत. ते पुढे म्हणाले की बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात मातोश्रीच्या पहिल्या माळ्यावर त्यांना काय जेवण दिलं जात होतं हे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं, हे उद्धव ठाकरे विसरले असे परांजपे म्हणाले. आज बाळासाहेबांबद्दल शिवसेनेने काय करावे, याचे उपदेश देणाऱ्यांनी त्यांचा पूर्वइतिहास तपासून बघावा, असा टोला परांजपे यांनी केला. बाळासाहेब हे प्रत्येक शिवसैनिकांसाठी दैवत आहेत, त्यांचा अपमान स्वप्नात देखील कोणी करणार नाही,” असे परांजपे म्हणाले.
शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
ते पुढे म्हणाले की, “२७ ऑगस्ट २००४ रोजी शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनात बाळासाहेबांनी मणिशंकरला जोडे मारले होते. बाळासाहेब मातोश्रीत वापरत असलेली स्वत:ची चप्पल घेऊन आले होते, त्याच पांढऱ्या चप्पलने बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला पहिला जोडा मारला होता, त्याचप्रमाणे सोनिया आणि राहुल गांधींच्या पुतळ्याला चप्पल मारण्याचे धारिष्ट्य उद्धव ठाकरे दाखवणार का, असा सवाल परांजपे यांनी केला. सावरकरांचा अवमान करणाऱ्या सोनिया गांधींवर आणि राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत करतील का,” असेही परांजपे म्हणाले.
Ans: ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या कथित उल्लेखांवरून वाद निर्माण झाला आहे. या उल्लेखांमधून सावरकरांचा अवमान झाल्याचा आरोप केला जात आहे.
Ans: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर जात काँग्रेससोबत युती केली, असा आरोप आनंद परांजपे यांनी केला. सावरकरांच्या कथित अवमानाविरोधात उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले.
Ans: सावरकरांविषयी प्रेम आणि आदर असेल तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन करावे आणि पुस्तकातील कथित आक्षेपार्ह उल्लेखांवर भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान परांजपे यांनी दिले.






