
तामिळनाडूत राजकीय भूकंप? भाजपचे Operation Lotus? पंतप्रधान मोदी आज थेट...
आज पंतप्रधान मोदी तामिळनाडू दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी चेन्नईत रॅलीला करणार संबोधित
मदुरथगंमध्ये मैदानावर जय्यत तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईमधील चेंगलपटू येथे एका विशाल सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी मदुरथगंमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान आजच्या सभेला संबोधित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्याची शक्यता आहे.
आजच्या चेन्नईमधील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएचे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये जवळपास 15 लाख नागरिक येण्याचा अंदाज एनडीएने व्यक्त केला आहे. उत्तर तामिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे म्हटले जात आहे.
चोख बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तामिळनाडू दौऱ्यानिमित सभेच्या आणि रॅलीच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था असून 3500 पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्तात असणार आहेत. ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका विशाल रॅलीला संबोधित करणार आहेत.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल तामिळनाडू भाजपचे निवडणूक प्रभारी असून गेले तीन दिवस ते राज्यात ठाण मांडून बसल्याचे समोर येत आहे. तामिळनाडू राज्यात भाजप युती करण्यासाठी चर्चा करत आहे. चेन्नईत या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याची चर्चा सुरू आहे.
Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या त्यांच्या मतदारसंघ रायबरेली येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीत पक्षाने आयोजित केलेल्या मनरेगा चौपालचा समावेश होता. त्यांच्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी रोहनिया ब्लॉकमधील उंचाहार भागात “मनरेगा बचाओ चौपाल” चे अध्यक्षपद भूषवले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ग्रामस्थ आणि कामगारांशीही संवाद साधला. या काळात, राहुल गांधींनी सुधारित VB-G RAM-G कायद्यातून महात्मा गांधींचे नाव काढून टाकल्याचाही निषेध केला. काँग्रेस खासदाराने आज राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये युथ स्पोर्ट्स अकादमी रायबरेलीने आयोजित केलेल्या रायबरेली प्रीमियर लीगचे उद्घाटनही केले.