PM Narendra Modi tweet on the Waqf Board Amendment Bill Passed in loksabha and rajyasabha
नवी दिल्ली : देशामध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन जोरदार चर्चा रंगली आहे. संसदेमधील दोन्ही सभागृह अर्थात राज्यसभा व लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. लोकसभेमध्ये विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली. वक्फ बोर्ड विधेयकाला राज्यसभेमध्ये बाजूने 128 मते पडली, तर विरोधात 95 मते पडली. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्ड विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेमध्ये विधेयक मंजूर झाल्यावेळी पंतप्रधान मोदी हे सभागृहामध्ये उपस्थित नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या थायलंड या देशाच्या दौऱ्यावर आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सत्ताधारी भाजपमधील सर्वच नेत्यांनी या विधेयकाची मंजूरी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचे मत मांडले आहे. यामधून मुस्लीम समाजाचे हिताचे आणि प्रगतीचे निर्णय घेतले जातील असे मत सत्ताधारी नेते व्यक्त करत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर करणे हा देशासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. हे सामाजिक-आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि समावेशक विकासासाठी आपली सामूहिक वचनबद्धता अधोरेखित करते. हे विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर ठरेल जे दीर्घकाळ दुर्लक्षित आहेत, ज्यांचे आवाज ऐकू येत नाहीत आणि ज्यांना संधींपासून वंचित ठेवले गेले आहे.”
पुढे लिहिले आहे की, “गेल्या अनेक दशकांपासून, वक्फ व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव आहे. यामुळे आपल्या मुस्लिम माता-भगिनी, गरीब आणि पसमंडा मुस्लिम बंधू-भगिनींच्या हिताचे मोठे नुकसान होत होते. आता संसदेने मंजूर केलेले विधेयक पारदर्शकता वाढविण्यास तसेच लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास मदत करेल,” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
इसके साथ ही हम एक ऐसे युग में प्रवेश करेंगे, जो आज के समय के अनुरूप होने के साथ ही सामाजिक न्याय को लेकर प्रतिबद्ध होगा। देश के हर नागरिक की गरिमा को प्राथमिकता मिले, इसके लिए हम संकल्पबद्ध हैं। यह मार्ग ज्यादा सशक्त, समावेशी और संवेदनशील भारत के निर्माण में काफी महत्वपूर्ण होने…
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे पंतप्रधान मोदींच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “यासह आपण अशा युगात प्रवेश करू जो सध्याच्या काळाशी सुसंगत असेल आणि सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध असेल. देशातील प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य दिले जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अधिक सक्षम, समावेशक आणि संवेदनशील भारत निर्माण करण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाचा ठरणार आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत.