पुणे: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखलकरून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. दरम्यान या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने अहवाल सादर केला आहे. त्यावर आता भिसे कुटुंबाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालायच्या अहवालावर भिसे कुटुंबाने आक्षेप घेतला आहे. दीनानाथ मंगेशकर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उपचारांसाठी गेलो होतो. रूग्णालाय प्रशासनाने दिलेला अहवाल खोटा असल्याचे भिसे कुटुंबाने म्हटले आहे. यामधून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी काही घडले त्यासाठी नव्हे तर आमची त्या दिवसासाठी होती.
त्या दिवशी आम्हाला दोन ते तीन तासांमध्ये उपचार नाही मिळाले. पेशंटसमोर तुम्ही 20 लाख रुपये सांगितले. 10 लाख डिपाॅझिट करण्यास सांगितले. ते दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले आम्ही त्यांच्याकडे कधी गेलो नाही. पण आम्ही आधी गेल्याच पुरावा आमच्याकडे आहे. त्यांनी 7 दिवसांनी आमच्याकडे फॉलोआपला यायला सांगितले. 2 एप्रिलला बोलावले होते. जर काही त्रास वाटला तर तुम्ही अॅडमिट देखील होऊ शकता असे देखील त्यांनी सांगितले होते. हे जर खोटे वाटत असेल तर त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपास. माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग चेक करा. विनाकारण लोकांची दिशाभूल करू नका.
भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू
सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी मोनाली या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखलकरून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.
Pune News: मंगेशकर रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे गर्भवतीचा मृत्यू; बावनकुळे म्हणाले, “… ही तर मुघलशाही”
मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाने याबाबत काहीही पावले उचलली नाही. सकाळी ९ वाजता आलेली महिला दुपारी दोनपर्यंत त्याच ठिकाणी होती, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. नंतर महिला अतिरक्तस्त्राव होत असल्याने वाकड येथील एका रुग्णालयात दाखल झाली. त्याठिकाणी उपचार सुरू झाल्यानंतर महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. परंतु, मोनाली यांचा मृत्यू झाला.