Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

बसपाची अंतर्गत संघटना सातत्याने कमकुवत होत आहे. पक्षाला पुढे नेण्यासाठी कोणावर विश्वास ठेवावा, याबद्दल बसपा सर्वेसर्वा मायावती साशंक आहेत. त्यांनी सुरुवातीला बसपाची सूत्रे आपला भाचा आकाश आनंद याच्या हाती दिली, पण नंतर त्याला सर्व पदांवरून हटवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 14, 2026 | 12:42 PM
देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : एकेकाळी उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करण्याची प्रबळ क्षमता असलेला पक्ष मानला जाणारा बहुजन समाज पक्ष येत्या काळात अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत असल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे, प्रत्येक निवडणुकीनंतर बसपाच्या मतांचा वाटा सातत्याने घसरत आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोग त्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करून त्याला प्रादेशिक पक्ष म्हणून घोषित करण्याचा विचार करत आहे.

निवडणूक आयोग उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची वाट पाहत आहे. जर यावेळी बसपाची कामगिरी खराब राहिली, तर निवडणूक आयोग त्याला प्रादेशिक पक्ष म्हणून घोषित करू शकतो. इतकेच नाही, तर राष्ट्रीय स्तरावर त्याला दिलेले हत्तीचे चिन्ह बदलले जाऊ शकते. त्याऐवजी, उत्तर प्रदेशात प्रादेशिक पक्षांसाठी राखीव असलेल्या विविध चिन्हांपैकी एक चिन्ह त्याला दिले जाऊ शकते. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात बसपासाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो.

दरम्यान, बहुजन समाज पक्षाकडे सध्या देशभरात एकही आमदार नाही. इतकेच नाही, तर त्यांच्याकडे राज्यसभा किंवा लोकसभेचा एकही खासदार नाही. बसपाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, कोणत्याही सभागृहात पक्षाचा एकही राजकीय प्रतिनिधी नाही.

बसपाची अंतर्गत संघटना सातत्याने होतेय कमकुवत

बसपाची अंतर्गत संघटना सातत्याने कमकुवत होत आहे. पक्षाला पुढे नेण्यासाठी कोणावर विश्वास ठेवावा, याबद्दल बसपा सर्वेसर्वा मायावती साशंक आहेत. त्यांनी सुरुवातीला बसपाची सूत्रे आपला भाचा आकाश आनंद याच्या हाती दिली, पण नंतर त्याला सर्व पदांवरून हटवले. आकाश आनंद बसपामध्ये परतला, पण यावेळी त्याचे राजकीय जीवन अल्पकाळ टिकले. बसपा सर्वेसर्वा मायावतींनी त्याला पक्षातून आणि सर्व पदांवरून काढून टाकले. मायावतींनी आकाश आनंदवर त्याच्या सासऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांना आणि पक्षाला कमकुवत करण्याचे काम करत असल्याचा आरोपही केला.

भाची दीपिकाच्या हाती पक्षाची सूत्र देण्याची शक्यता

मायावतींनी पक्षाची सूत्रे आपली भाची आणि आकाश आनंद व ईशान आनंद यांची बहीण असलेल्या दीपिका आनंदकडे सोपवण्याचे संकेत दिले. ती सध्या लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. तथापि, मायावतींनी असेही म्हटले आहे की, दीपिका आनंदच्या कामाचे निरीक्षण केल्यानंतर बसपामध्ये तिला मोठी भूमिका देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

मायावतींचा नेहमीच घराणेशाहीला विरोध

बसपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, मायावतींनी नेहमीच घराणेशाहीला विरोध केला आहे, परंतु अखेरीस, त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणून कुटुंबातीलच व्यक्ती हवी आहे. पक्षात इतर दलित नेते नाहीत का? तथापि, काहींच्या मते, दीपिका आनंदकडे पक्षाची सूत्रे सोपवून मायावतींनी चांगला निर्णय घेतला आहे. यामुळे बसपा एका महिलेच्या हातात येईल. इतर कोणत्याही पक्षात दलित महिलेने इतके उच्च पद आणि सन्मान मिळवलेला नाही. हे फक्त बसपामध्येच घडू शकते. दीपिका आनंद बसपा सर्वेसर्वा मायावतींच्या कुटुंबातील असली तरी, त्याने काही फरक पडत नाही.

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

Web Title: Possibility of bsp losing its elephant symbol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Bahujan Samaj Party
  • indian politics
  • political news

संबंधित बातम्या

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
1

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी
2

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले
3

‘वाघाला डिवचू नका, वाघ जागा झाला तर भारी पडेल’; शिवेंद्रराजेंच्या डरकाळीने जावळीतील राजकारण तापले

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती
4

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.