Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’

Pradeep Purnekar Murder Case : ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरेंनंतर सुषमा अंधारेंनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेत पोलिसांच्या तपासावर आणि काही व्यक्तींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Oct 03, 2026 | 02:56 PM
Sushma Andhare on Meenakshi Shinde

Sushma Andhare on Meenakshi Shinde

Follow Us
Follow Us:
  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर सुषमा अंधारेंची पत्रकार परिषद.
  • मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेबाबत अंधारेंचा सवाल.
  • कथित पाच कोटींचा व्यवहार आणि हॉटेल महाराजाच्या CCTV तपासाची मागणी
 

Pradeep Purnekar Murder Case : ठाण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता. आता सुषमा अंधारे यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, पूर्णेकर कुटुंबीयांसोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत. हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली असली तरी आणखी काही व्यक्तींवर कारवाई झालेली नाही, असा दावा त्यांनी केला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

‘पहिल्याच जबाबात नाव घेतलं’

सुषमा अंधारे यांच्या दाव्यानुसार, प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने पहिल्याच दिवशी दिलेल्या जबाबात मीनाक्षी शिंदे यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे या दिशेने पोलिसांनी तपास केला आहे का, असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. पूर्णेकर यांनी क्लस्टरच्या मुद्द्यावरून तसेच कथित गैरप्रकारांविरोधात आवाज उठवला होता, असंही अंधारेंनी म्हटलं. मीनाक्षी शिंदे यांच्या जात प्रमाणपत्रावरही पूर्णेकर यांनी आक्षेप घेतल्याचा दावा त्यांनी केला.

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

व्हायरल ऑडिओवरूनही सवाल

या प्रकरणातील व्हायरल ऑडिओ क्लिपचा मुद्दाही अंधारेंनी उपस्थित केला. मीनाक्षी शिंदे यांनी हा ऑडिओ AI-निर्मित असल्याचं म्हटलं असल्याचा उल्लेख करत, जर ऑडिओ बनावट असेल तर त्याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला.

तसंच मीनाक्षी शिंदे, राजा शिंदे आणि ‘टल्ल्या’ यांची पवारनगर येथे भेट झाल्याचा दावा करत पोलिसांनी या संदर्भात माहिती तपासावी, अशी मागणी अंधारेंनी केली.

‘पाच कोटींचा व्यवहार’; CCTV तपासण्याची मागणी

पूर्णेकर हत्या प्रकरणात पाच कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. याशिवाय हत्या होण्याच्या आधी सुमारे 15 दिवसांपासून रेकी सुरू असल्याचाही दावा त्यांनी केला. हॉटेल महाराजाचे CCTV फुटेज तपासण्यात यावेत, अशी मागणीही अंधारेंनी केली.

Sanjay Raut on Purnekar : प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Web Title: Pradeep purnekar murder case sushma andhare allegations meenakshi shinde vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Meenakshi Shinde
  • Pradeep Purnekar
  • Shivsena UBT
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात
1

Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
2

Pradeep Purnekar Case: ‘आदित्य ठाकरेला अटक…’, दिशा सालियन प्रकरणावरून मीनाक्षी शिंदे आक्रमक; उद्धव-आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
3

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
4

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.