Prahar leader Bachchu Kadu criticized Navneet Rana and Ravi Rana Maharashtra Politics
Maharashtra Politics: अमरावती: सर्वत्र दिवाळी उत्साह दिसून येत असून आनंदासा भरते आले आहे. मात्र राजकीय वर्तुळामध्ये टीकांची लाखोली वाहिली जात आहे. दिवाळीच्या उत्सवामध्ये राजकीय फटाकेही फुटताना दिसत आहेत. रवी राणा आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या कलगीतुरा रंगताना दिसून येत आहे. रवी राणा यांनी कडूंवर विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तर बच्चू कडू यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
रवी राणा आणि नवनीत राणा हे अनेकदा बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केला. बच्चू कडू यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंना भेटल्याचा आणि आंदोलनाद्वारे सरकारवर दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. यावर बच्चू कडूंनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच नवनीत राणायांचा उल्लेख करत या दोघांसारखे नौटंकी जोडपे संपूर्ण देशात सापडणार नाही अशी टीका केली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
रवी राणा यांनी आरोप करताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचा खरपूस समाचार घेतला आहे. बच्चू कडू म्हणाले की, भाजप बायकोमध्ये आणि नवरा युवा स्वाभिमान मध्ये हे कशासाठी याच स्पष्टीकरण आधी तुम्ही द्या. याला कसला स्वाभिमान म्हणायचं ना मान ना कसला स्वाभिमान. राणा एवढं नौटंकी जोडपं तर देशात पाहायला मिळणार नाही. असं कुठे आहे का भाजप नाव बायको भाजपात आणि नवरा स्वाभिमान संघटनेत. याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही या एवढी नाचक्की यांच्यावर येत असेल तर अधिक काय बोलावे. तुम्हीच गटार गंगेत उभे आहेत आणि तुम्ही राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत आहात, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “दिवाळीच्या दिवशी देखील राणांना बच्चू कडूंची आठवण येते म्हणजे किती झालं .राहले देवधर्म प्रभू रामचंद्र सोडून दिले आणि माझी आठवण करतात. किती जिव्हाळा आहे किती प्रेम आहे दिसून पडलं. मी विधान परिषद साठी करतो अस म्हणतात पण हे धंदे तुमचे आहे. सगळ्या पक्षाचे पाठिंबा घेऊन तुम्ही निवडणुका लढता कधी मशिदीमध्ये जाता कधी मंदिरात जाता कधी नमाज पडायचा तर कधी प्रभू रामचंद्र च नाव घेऊन राजकारण करायचं हा तुमचा धंदा झाला आहे. राणांची मजबुरी आहे, त्यांना बोलावं लागतं त्यांना वरून कार्यक्रमाला आहे. त्यांना लाचारी करावीच लागते,” असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही माझ्या औकातीत येऊ शकत नाही, मी मरेपर्यंत सांगतो बच्चू कडू हा मरेपर्यंत आणि मेल्यावर कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. कुण्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही. जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर. ते तुमची लायकी आहे. तुम्ही लायसाठी धंदे करता तुम्हाला वरून कार्यक्रमाला आहे. वरून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम दिला आणि तुम्ही बोलायला लागले दोघेजण,” असा घणाघात बच्चू कडू यांनी केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, ” ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या मोदींना शिव्या दिल्या त्या आता भाजपच्या नेत्या झाल्या. हा कार्यक्रम देवेंद्र फडणीस यांनी दिला आहे देवेंद्र फडणवीस राणांना बोलायला लावतात की बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलन करता येते थांबलं पाहिजे. हे राणा दाम्पत्य शेतकरी विरोधात आहे. शेतमजुराविरोधात आहे. एक एक थैली किराणा दिला म्हणजे दिव्यांगाचा समस्या संपल्या का तो आयुष्य कसा काढतो तो कसा जगतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकदा पूर्ण हिशोब करावाच लागेल आंदोलन झाल्यावर पाहू,” असा थेट इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याला दिला.