Prahar leader Bachchu Kadu Disqualified from the post of chairman of Amravati District Bank
अमरावती : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक नेत्यांचे दौरे वाढले असून आढावा घेतले जात आहेत. तसेच अनेक पक्षाच्या युतीच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. एकीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. यामध्य़े आता प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू हे देखील आक्रमक झाले आहेत.
माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरले आहेत. बच्चू कडू यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्ण घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांचे आजपासून (दि.08) उपोषण सुरु होणार आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रॅली आणि आंदोलन केले जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अमरावतीत भव्य बाईक रॅली काढली जाणार आहे. बाईक रॅली आधी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यामध्ये शेकडो बच्चू कडूंचे समर्थक सहभागी होणार आहेत. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी शिदोरी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी प्रशासनाकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जाणार असून बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या वतीने आवाज उठवणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयानंतर अमरावती ते मोझरी अशी भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या बाईक रॅलीमधून शेतकऱ्यांना समर्थन केले जाणार आहे. तसेच या भव्य बाईक रॅलीमधून प्रहार संघटनेचे आणि बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांची रॅली आणि आंदोलन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. यामध्ये 15 ते 20 हजार दुचाकी बाईक रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर बच्चू कडू यांची गुरुकुंज मोझरी येथे सभा पार पडणार आहे. यावेळी बच्चू कडू शेतकऱ्यांशी काय संवाद साधणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ही सभा पार पडल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली जाईल. जो पर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा
बच्चू कडू यांनी दिला. त्यामुळे अमरावतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.