Thackeray Brothers Alliance: ठाकरे गटाचे उरलेले आमदार-खासदार...; ठाकरे बंधुं एकत्र येताच गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट
Girish Mahajan News: “प्रत्येकाने निवडणुका जिंकण्याचा ठाम निर्धार करा. भाजप कोणतीही रिस्क घेणार नाही, त्यामुळे सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे, निवडणुका जिंकण्यासाठी संघटनात्मक बळ, मैदानातली उपस्थिती आणि जनतेशी प्रत्यक्ष संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकजुटीने काम करून भाजपला स्थानिक स्तरावरही बळकट करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिल्या. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कार्यशाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका भाजप जिंकण्यासाठी निर्धारपूर्वक तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत गिरीश महाजन यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांसंदर्भात एकजुटीने राहण्याचा आणि निवडणुकीच्या कामाला सुरूवात करण्याचा सल्ला दिला. पक्षाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सातत्याने सक्रिय ठेवण्याचे धोरण स्वीकारले असून, निवडणुकीपूर्वी जनसंपर्क वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात येण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला…
आगामी निवडणुका भाजपने स्वबळावर आणि महायुती म्हणून शंभर टक्के जिंकायच्या आहेत, असा निर्धार केला. त्यासाठी जेष्ठ पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी मेहनत घ्यायची आहे. तरुणांना पक्षात जोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाकडून तरूणांना संधी दिली जाईल. पक्ष विस्तारासाठी आणि स्थानिक पातळीवरील संघटन वाढवण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नव्या लोकांना भाजपशी जोडण्याचे काम करावे. अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी होता कामा नये, पक्षात अंतर्गत गटबाजीला कोणताही थारा दिला जाणार नाही, निवडणुकीत उमेदवारीपासून, प्रचारापर्यंत सगळीकडे एकजुटीने काम झालेच पाहिजे, कोणत्याही प्रकारची गटबाजी आढळून आल्यास त्याला योग्य वेळी जागा दाखवली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत भाजप नेत्यांची संख्या आणि इच्छुक अधिक असल्याने सावधपणे निर्णय घ्यावे लागतील. पण गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी हा इशारा कुणाला दिला, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
जळगाव महापालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सत्ता असली तरी, जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने हे वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, अजय भोळे, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, उज्वला बेंडाळे, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. केतकी पाटील, राकेश पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. कार्यशाळेत या नेत्यांनी स्थानिक राजकीय घडामोडी, मतदारांचा कल आणि निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक त्या रणनीतींबाबत सविस्तर माहिती दिली.