
Prakash Mahajan joins BJP meets CM Devendra Fadnavis Criticism of Raj Thackeray
माजी मनसे नेते आणि जेष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत वक्तव्य केले. प्रकाश महाजन म्हणाले की, वर माझं वैयक्तिक काम आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पारिवारिक संबंध आहे, असे सूचक वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केले. पुढे ते म्हणाले की, “भाजपामध्ये वैभव खेडेकर खूप आनंदी आहे. माझ्या पाल्याचा आनंद पाहायला आलो आहे. वैभव खेडेकर कमळाकडे गेला. त्यामुळे मी खूश आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले. तसेच भाजपाचा पराभव झाल्यावर आम्हाला वाईट वाटतं, नातं जुनं आहे, असं सांगत मी कधीच भाजपाविरोधात काम केलेलं नाही. आता भाजपाने ठरवायचं आहे,” असं सूचक विधानही प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यामुळे प्रकाश महाजन भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
हे देखील वाचा : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं
त्याचबरोबर राज ठाकरे यांचे नाव घेत त्यांना घाबरत नसल्याचे वक्तव्य केले. प्रकाश महाजन म्हणाले की, “मनसे हिंदुत्वापासून दूर जाते आहे. त्यांनी हिंदूत्वाच्या प्रश्नावर माघार घेतली. मनसेतून बाहेर पडण्यामागे हेच कारण आहे, असंही प्रकाश महाजनांनी सांगितले. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. आम्ही कधी ते लपवलं नाही. मी राज ठाकरेंना घाबरत नाही. संघ विचारांचा मी माणूस आहे, शाखेत देखील जातो,” असं प्रकाश महाजन यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील अभिनेता रमेश परदेशी (पिट्या भाई)ने आपल्या सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केलेला. यावरुन राज ठाकरेंनी पिट्या भाईचा पुण्यातील एका बैठकीत पाणउतारा केला होता. यावरुनही प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
हे देखील वाचा : प्रश्न एक अन् उत्तरं तीन मंत्र्यांची; भर सभागृहात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी