
संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील 'त्या' निर्णयावर फोडला बॉम्ब (Photo Credit- X)
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे की, कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेला निर्णय हा राज ठाकरे यांच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत आहे. राऊत म्हणाले, राज ठाकरे या निर्णयामुळे व्यथित आहेत. स्थानिक नेत्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा अन्य कारणांमुळे हा निर्णय घेतला असून, तो पक्षाच्या धोरणांच्या विरोधात आहे.
संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसच्या कारवाईचे उदाहरण देत मनसेवर निशाणा साधला. अंबरनाथमध्ये भाजपसोबत गेलेल्या १२ नगरसेवकांवर काँग्रेसने जशी तात्काळ हकालपट्टीची कारवाई केली, तशीच कारवाई आता मनसेने आपल्या स्थानिक नेत्यांवर करायला हवी, असे राऊत यांनी सुचवले. पक्षाच्या मूळ भूमिकेला हरताळ फासणाऱ्या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, अशी अप्रत्यक्ष मागणी त्यांनी केली.
Maharashtra Politics: सत्तेसाठी काय पण? निवडणुकीत कट्टर विरोधक येणार एकत्र; इंदापूरचा विषय काय?
प्रचारादरम्यान ज्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान पेटवले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याच्या मनसेच्या या निर्णयामुळे मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. ठाकरे गटाकडून याला ‘संधीसाधूपणा’ म्हटले जात असून, आगामी काळात मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
मनसेच्या पाठिंब्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाची ताकद वाढली असली, तरी राज ठाकरे यावर काय अधिकृत भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर राज ठाकरेंनी या निर्णयावर नापसंती दर्शवली, तर मनसेच्या स्थानिक गटात फूट पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
KDMC Election Results: कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; मनसेचा शिंदे गटाला पाठिंबा