Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशांत किशोरांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीत खळबळ; सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरून अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका

प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यातील कथित सहा तासांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना वेग आला आहे. या चर्चांवर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देत प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय पक्षांतर्गत असल्याचे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 11, 2026 | 03:55 PM
sunil tatkare prashant kishor

sunil tatkare prashant kishor

Follow Us
Follow Us:
  • प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना हटवण्याचा सल्ला दिल्याची चर्चा.
  • अनिल पाटील यांनी अशा सूचना दिल्याचे मान्य केले नाही.
  • प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष घेतात, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांनी सध्या राजकीय वातावरण तापले आहे. प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याची चर्चा असून, ही बैठक तब्बल सहा तास चालल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीनंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पदावरून हटवण्याबाबत प्रशांत किशोर यांनी सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर अनिल पाटील यांचे स्पष्टीकरण

या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रदेशाध्यक्ष कोणाच्या सल्ल्याने बदलला जात नाही, असे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा मुद्दा हा पूर्णपणे पक्षांतर्गत असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आपल्याला अजिबात वाटत नसल्याचे अनिल पाटील यांनी म्हटले. पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांमध्ये अंतिम भूमिका राष्ट्रीय अध्यक्षांची असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा कुठेही झालेली नाही’

माध्यमांमध्ये आपल्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू असल्याबाबतही अनिल पाटील यांनी भाष्य केले. माध्यमांना ज्या पद्धतीने सूत्रांकडून माहिती मिळते, त्याचप्रमाणे आपलीही काही सूत्रे असल्याचे सांगत त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षात कुठेही चर्चा झाल्याचे आपल्याला जाणवत नसल्याचे स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष होण्यापेक्षा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यामध्ये आपल्याला अधिक आनंद असल्याचे पाटील यांनी सांगितले. पक्षाने भविष्यातही कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

‘अंधारे आल्या अन् सेना गेली, वैफल्यातून पालकमंत्र्यांवर आरोप’ – आमदार देवेंद्र कोठे, सुषमा अंधारेंच्या टीकेला भाजपचा पलटवार

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत विविध राजकीय तर्क-वितर्क सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीबाबतही चर्चा रंगल्या आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे अनिल पाटील यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या बैठकीनंतर सुरू झालेल्या या चर्चांना प्रत्यक्षात पक्षाच्या पातळीवर किती महत्त्व दिले जाते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Web Title: Prashant kishor meeting sunetra pawar parth pawar sunil tatkare anil patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • NCP Party
  • Prashant Kishore
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण
1

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, ‘आमदारांची लुडबूड…’
2

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, ‘आमदारांची लुडबूड…’

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रशांत किशोरांची एन्ट्री? सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट, नव्या रणनीतीची चर्चा
3

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रशांत किशोरांची एन्ट्री? सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट, नव्या रणनीतीची चर्चा

‘वेळ येऊद्या मग …’; ‘गुंगी गुडिया’ वादावर सुनेत्रा पवार यांची पहिली सूचक प्रतिक्रिया, वातावरण आणखी तापणार !
4

‘वेळ येऊद्या मग …’; ‘गुंगी गुडिया’ वादावर सुनेत्रा पवार यांची पहिली सूचक प्रतिक्रिया, वातावरण आणखी तापणार !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.