Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपांची देवाणघेवाण सुरू असून, या वादाने खालची पातळी गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 16, 2026 | 08:30 PM
Pratap Sarnaik : मीरा-भाईंदरचे राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली, सरनाईक-मेहता आमनेसामने
Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदरचे राजकारण तापले;
  • आरोप-प्रत्यारोपांची पातळी घसरली,
  • सरनाईक-मेहता आमनेसामने
भाईंदर/विजय काते : शहरातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले असून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता अधिक तीव्र झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोपांची देवाणघेवाण सुरू असून, या वादाने खालची पातळी गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निवडणुकीनंतर काहीसा शांत झालेला राजकीय संघर्ष पुन्हा पेटला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. मंत्री प्रताप सरनाईक हे वारंवार ठाण्यावरून येऊन माझ्यावर आरोप करतात, असा पलटवार माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केला.

मेहता म्हणाले, “सरनाईक यांनी मिरा-भाईंदरमध्ये माझ्या 30 टक्के जागा असल्याचा आरोप केला. जर एवढी संपत्ती माझ्याकडे असती, तर तिची किंमत २ लाख कोटींहून अधिक झाली असती. एवढे पैसे असते तर मी सरनाईक यांनाच कामावर ठेवले असते.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.याचबरोबर, पूर्वेश यांनी पाठवलेल्या पत्राला आपण उत्तर देणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. मात्र, पूर्वेश यांनी काहीही चुकीचे बोलले नसल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदनही केले.संस्कारांबाबत टीका करताना मेहता यांनी सरनाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “जी शिकवण ते आज देत आहेत, ती आधी आपल्या वडिलांना दिली असती, तर आजची वेळ आली नसती,” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. तसेच, कोणतेही वक्तव्य करताना जबाबदारीने आणि पुराव्यांसह बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये “झोम्बी ड्रग”चा शिरकाव? सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मराठी सक्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देताना, “सरनाईक यांच्या वक्तव्याला मी गांभीर्याने घेत नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत,” असे स्पष्ट केले.दरम्यान, लोकदरबारात सेव्हन इलेव्हन कंपनीबाबत झालेले आरोप ‘प्लॅन्टेड’ असल्याचा दावा करत मेहता यांनी हे सर्व राजकीय डाव असल्याचे सांगितले.एकूणच, मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस ढवळून निघत असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिक मात्र या आरोप-प्रत्यारोपांमुळे विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत आहेत.

Mira Bhayander : ”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका

Web Title: Pratap sarnaik mira bhayander politics heated up the level of accusations and counter accusations decreased sarnaik mehta face to face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Narendra Mehta
  • navrashtra news
  • political news
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
1

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
2

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर
3

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
4

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.