Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’

सध्या सीजेपी आणि काँग्रेस पक्षासह अनेक पक्षांचे नेते आणि स्पर्धा परीक्षेचे उमेदवार दिल्लीत रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळही आंदोलन करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 22, 2026 | 07:21 AM
केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सध्या विद्यार्थी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही विविध वक्तव्ये केली जात आहेत. त्यात आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, ‘विद्यार्थ्यांमध्ये केवळ राग व्यक्त करण्यापेक्षा अधिक काहीतरी करण्याची गरज आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहेत’.

दिल्लीसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आणि तरुणांमधील संताप टोकाला गेला आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहेत. सरकारच्या जबाबदारीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “केवळ राग व्यक्त करण्यापेक्षा तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक काहीतरी करण्याची गरज आहे.” सध्या सीजेपी आणि काँग्रेस पक्षासह अनेक पक्षांचे नेते आणि स्पर्धा परीक्षेचे उमेदवार दिल्लीत रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळही आंदोलन करण्यात आले.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “आमचे सरकार नीटवर चर्चा करण्यासाठी आणि सभागृहात आमच्या तरुणांच्या प्रत्येक खऱ्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी १००% कटिबद्ध आहे. भारतातील विद्यार्थी राजकीय प्रचारातील प्यादी बनण्यापेक्षा खूप चांगल्या वागणुकीस पात्र आहेत. त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणाबाजीऐवजी उपाय आणि व्यत्ययाऐवजी जबाबदारी मिळायला हवी.”

धर्मेंद्र प्रधान नेमकं काय म्हणाले?

सर्वसमावेशक चर्चेसाठी सरकारची तयारी असूनही, काँग्रेसने लोकशाही चर्चेऐवजी दुसरा मार्ग निवडला. विद्यार्थ्यांसाठी उपाय शोधणे हा त्यांचा उद्देश नाही, तर राजकीय व्यत्यय निर्माण करणे हा आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या हितासाठी बोलत नाहीत. चर्चेची खरी संधी असूनही ते संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

काँग्रेस आणि सीजेपीच्या मागण्या काय?

नीट पेपरफुटी आणि शिक्षण सुधारणांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेले आंदोलन मंगळवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास संपले. प्रधान यांचा राजीनामा ही काँग्रेस आणि सीजेपी या दोघांच्याही प्रमुख मागण्यांपैकी एक आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.

Vijeta Dahiya : तो ‘व्हायरल व्हिडिओ’ नडला ! कॉकरोच जनता पार्टीची मोठी कारवाई; विजेता दहिया यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

Web Title: Rahul gandhi is taking advantage of students says dharmendra pradhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 07:13 AM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • political news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
2

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!
3

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
4

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.