Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या ६ खासदारांना विरोधी पक्षात विलीन करण्यास मान्यता दिली आहे. हे खासदार पक्षाच्या मान्यतेशिवाय वेगळे झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 22, 2026 | 07:53 AM
मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या 'त्या' सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या 'त्या' सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६ खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्यास दिलेल्या मान्यतेला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात कलम ३२ अन्वये याचिका दाखल केली आहे. ६ खासदारांच्या विलीनीकरणानंतर ठाकरे गटाकडे आता लोकसभेत केवळ ३ खासदार उरले आहेत. तर या निर्णयामुळे शिंदे गटाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे.

Ajit Pawar Birthday : ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती

ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत म्हणाले, लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या ६ खासदारांना विरोधी पक्षात विलीन करण्यास मान्यता दिली आहे. हे खासदार पक्षाच्या मान्यतेशिवाय वेगळे झाले आहेत. यामुळे संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात राजकीय पक्ष म्हणून आमचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.

तातडीने सुनावणी नाही

ठाकरे गटाच्या वकिलांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली. मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठाने तातडीने सुनावणी घेण्याचे कोणतेही आश्वासन दिले नसून विचार करू, असे म्हटले.

सहा खासदार कोणते?

संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी), संजय दिना पाटील (मुंबई ईशान्य), नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली), ओमप्रकाश राजेनिंबाळकर (धाराशिव), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी).

याचिकेत मांडलेले मुख्य मुद्दे

असंवैधानिक विलीनीकरण : याचिकेत म्हटले की, वादग्रस्त परिपत्रक हे त्या ६ खासदारांच्या कृतीला मान्यता देते, ज्यांनी आपल्या मूळ ‘शिवसेना (उबाठा)’ पक्षाच्या संमतीशिवाय एकतर्फी निर्णय घेत स्वतःला शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करून घेतले.

दहाव्या अनुसूचीचे उल्लंघन : याचिकेनुसार, राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीचा परिच्छेद ४ हा विलीनीकरणाला केवळ पक्षांतर विरोधी कारवाईदरम्यान बचाव किंवा संरक्षण म्हणून मान्यता देतो. या प्रकरणात शिवसेना (उबाठा) पक्षाने अद्याप कोणत्याही खासदाराविरोधात पक्षांतर विरोधी कारवाई सुरू केलेली नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेरचा आहे.

घटनात्मक संकट : याचिकेत म्हटले की, वस्तुतः हे विद्यमान प्रकरण संसद आणि राज्य विधानसभांमध्ये राजकीय पक्षांच्या कामकाजाशी संबंधित निर्माण झालेल्या एका मोठ्या घटनात्मक संकटाचे उत्तम उदाहरण आहे.

Web Title: Trouble to increase for six mps of the thackeray faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 07:50 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?
1

Devendra Fadnavis Birthday: संघ स्वयंसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांनी कसा गाजवलाय आपला दबदबा?

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती
2

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’
3

केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग…’

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.