Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यासोबत राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी राहुल गांधी यांनी चव्हाणांच्या तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

  • By विवेक
Updated On: Sep 06, 2026 | 06:23 PM
पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा

पृथ्वीराज चव्हाणांची राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा

Follow Us
Follow Us:
  • SIR प्रक्रिया, शेतकरी आत्महत्या आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा
  • शक्तीपीठ महामार्ग आणि नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चाचाही विषय राहुल गांधींसमोर मांडला
  • राहुल गांधींनी पृथ्वीराज चव्हाणांच्या तब्येतीची विचारपूस करत पुन्हा सक्रिय होण्याचं आवाहन 
 

सातारा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान नाशिक येथे भेट देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने २४ ऑगस्टपासून आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी सविस्तर चर्चा करून महाराष्ट्रासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांचा आढावा घेतला.

या प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्याशी राज्यातील सद्यस्थिती तसेच जनतेसमोरील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत सखोल चर्चा केली. बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया, शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, महिला व बालकांवरील गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील कथित अनियमितता व भ्रष्टाचार या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. या समस्यांबाबत काँग्रेस पक्षाने अधिक प्रभावीपणे जनतेच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष हा जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून विरोधी पक्ष म्हणून लोकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील, असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढा देईल तसेच जनतेच्या आवाजाला अधिक बळ देण्याचे काम करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवर झालेल्या या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील वास्तव परिस्थिती राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून देत जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्याची गरज अधोरेखित केली. काँग्रेस संघटना अधिक मजबूत करून राज्यातील जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Chala Shaalet Jauya Campaign: CJPच्या स्कूल ठीक करो मोहिमेचा इम्पॅक्ट; राज्य सरकारकडून ‘चला शाळेत जाऊया’ विशेष अभियान घोषणा

यावेळी राहुल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये त्यांचा अनुभव व मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

Web Title: Prithviraj chavan rahul gandhi maharashtra issues meeting health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Congress
  • pruthviraj chavhan
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!
2

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेच्या ‘शुद्धीकरण’; भाजप प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा; बंगळूरमध्ये Zero FIR!

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
3

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
4

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.