Radha krushna Vikhe patil on nashik politics on kumbha mela
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा पूर आला असून मित्रपक्षांमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाला गळती लागली असून अनेक नेते पक्षांतर करत आहे. तर शरद पवार यांच्यावर देखील ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महायुतीमधील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आता दोन्ही नेत्यांमध्ये चार तास बंद दारा आड चर्चा झाली आहे. यामुळे राजकारण रंगले आहे. यावर भाजप नेते व जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीवर देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना माहिती असेल. त्या भूमिकेत लवचिकता आली नाही. तडजोड करण्याची भूमिका नाही. या भेटीबाबत प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. बैठकीला तिघे होते, त्यांनी द्यायला पाहिजे. किती झाली हे मी असतो तर सांगितलं असते, असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे त्यांनी नाशिकमधील राजकारणावर देखील भाष्य केले आहे. नाशिकमध्ये पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यामुळे कुंभमेळ्याच्या आढावा बैठकचा धडाका सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कुंभमेळ्याची आढावा बैठक घेतली आहे. यामुळे महायुतीमध्ये यावरुन राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा देखील केला आहे. याबाबत देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी मत मांडले आहे.
नाशिकच्या राजकारणावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “मला वाटत नाही की महायुतीमध्ये नाशिकमध्ये कॉल्ड वॉर सुरु आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा घेण्याचे काम मोठे आहे. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांचे दायित्व आहे. नगर विकास खात्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. मी पण आज मनपात बैठक घेतो आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात दूषित पाणी नदीत जात आहे. त्याबाबत आढावा घेत आहे. अहिल्यानगरचा पालकमंत्री म्हणून मी समाधानी आहे. यंत्रणा कार्यान्वित झाली आहे तिन्ही नेते आढावा घेतील,” अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पीक विम्याचे कौतुक करताना माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी असल्याची उपमा दिली आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, “माणिकराव कोकाटे हे सडेतोड बोलणारे व्यक्ती आहेत. त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केले माहिती नाही. पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच,” अशी भूमिका भाजप नेते आणि जलसंधारण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मांडली आहे.