शिवसेनेच्या 'टायगर ऑपरेशन'नुसार आता ठाकरे सेनेच्या अजून एक 'विश्वासू' शिलेदारांचा पक्षप्रवेश? उदय सामंत यांचा सूचक इशारा
uday samant on bhaskar jadhav News in Marathi: कोकणातील राजापूर विधानसभेतील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धवसेनेचे शिवबंधन तोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रामात शिंदेसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदेसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. याचदरम्यान मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. एका मागून एक प्रवेश होतील. त्यात जुने सहकारी आपल्यासोबत येतील असा दावा त्यांनी केला होता. त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिंदे गट यशस्वी ठरला. आता उद्धव सेनेचे खमके शिलेदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने दोन्ही गटाच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटात अनेक जण प्रवेश करीत आहेत. याचपार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे भास्कर जाधव शिवसेनेत आले, तर त्यांचे स्वागतच करू. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास कोकणात शिवसेनेची आखणी ताकद वाढेल, असेही सामंत यांनी म्हटले.
महायुतीत लढायचं आमचं धोरण आहे. पण स्थानिक लेव्हलला काही लोकांना वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत तर आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील अनेक जण आमच्यासोबत येणार आहेत. त्यांचा आज प्रवेश होत आहे. यामध्ये माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
यावेळी, आज प्रवेश करणाऱ्यांची लिस्ट वाचत बसलो तोवर एकनाथ शिंदे साहेब लँड होतील. 150 हुन अधिक प्रमुख पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून आमच्याकडे येतील. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढेल असं मला वाटत नाही. त्यांनी असं कुठे सांगतील नाही. महायुती म्हणून निवडणूक लढवायची अशी शिंदे साहेबांची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो हे कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी सांगावं लागते. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.
भास्कर जाधव विधिमंडळातील वरिष्ठ अशा व्यक्तीच्या मार्गदर्शन भविष्यात आम्हाला मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू त्यांनी काय करावे आणि नाही हा त्यांचा प्रश्न पण त्यांच्या अनुभव आणि त्यांची शैली यांचा उपयोग करून घ्यायला काहीजण कमी पडले. भास्कर जाधव नाराज असतील तर ते स्वतः सांगतील. त्यांचा नेतृत्व संघटन कौशल्याचं आणि त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचे दुर्दैव भास्कर जाधव यांचा नाही.मी माझ्या आयुष्यात कोणाचाही अनादर करणारा वक्तव्य केला असल्यास राजकीय संन्यास घेईन, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.