Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray: मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Raj Thackeray: मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिन मेळाव्यात राज ठाकरे यांनी सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीतील पैशांच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा करत, चौकशीची मागणी केली. तसेच अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचाही उल्लेख करत सरकारवर टीका केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 02:56 PM
मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • ‘सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी’
  • राज ठाकरेंचा गंभीर आरोप
  • सिद्धीविनायक आणि राम मंदिरावरील राज ठाकरेंचे मोठे दावे
Raj Thackeray Speech News Marathi: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत (Mumbai News) आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंदिरांतील दानपेट्यांमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. विशेषतः मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला.

सिद्धीविनायक मंदिराबाबत काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले की, त्यांच्याकडे सिद्धीविनायक मंदिर न्यासासंदर्भातील एक पत्र आले आहे. त्या पत्रात मंदिरातील दानपेटीतील रकमेच्या कथित गैरव्यवहाराचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी पकडले जाण्यापूर्वी दर बुधवारी दानपेटीतील मोजणी 50 लाख रुपयांच्या आसपास होत होती. मात्र संबंधित कर्मचारी पकडल्यानंतर हीच रक्कम 1.5 कोटी रुपयांपर्यंत वाढली. यावरून दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात रक्कम लंपास होत असल्याचा दावा त्यांनी केला. राज ठाकरे यांनी या प्रकारामागील धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

Amit Thackeray Speech: ‘मी विसरलो, खरंच सुचत नाही…’, अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले, सभागृहात क्षणभर शांतता

‘श्रद्धेचीही चोरी होत आहे’

यावेळी त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “भाविक श्रद्धेने मंदिरात जाऊन दान करतात. विद्यार्थी परीक्षेपूर्वी देवदर्शनासाठी मंदिरात जातात. पण त्याच मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरीला जात असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.” मंदिर प्रशासन आणि विश्वस्तांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राम मंदिराचाही केला उल्लेख

भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराचाही उल्लेख केला. त्यांनी राम मंदिर हे देशाच्या भावनांशी जोडलेले असल्याचे सांगत, तेथे 1,400 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा दावा केला आणि या विषयावर सरकार मौन का बाळगते, असा सवाल उपस्थित केला. तसेच राम मंदिराच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीचा उल्लेख करत, अशा आरोपांवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राजकीय चर्चांना उधाण

राज ठाकरे यांनी सिद्धीविनायक मंदिर आणि राम मंदिराबाबत केलेल्या या आरोपांमुळे राज्यातील आणि राष्ट्रीय राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या विधानांवर संबंधित यंत्रणा किंवा सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

Abhijeet Dipke on BJP IT Cell: विद्यार्थ्यांच्या आधी भाजपच्या आयटीसेलवर गुन्हा दाखल करा…: अभिजीत दिपकेंचा इशारा

Web Title: Raj thackeray alleges rs 18 crore theft at siddhivinayak temples ram mandir funds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • raj thackeray
  • Siddhivinayak Temple

संबंधित बातम्या

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका
1

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका

Maharashtra MLC Election Results 2026: कोणाचे पारडे जड? बंडखोरी अन् अपक्षांचे सावट; कशी आहेत ५ मतदारसंघांतील राजकीय समीकरणे
2

Maharashtra MLC Election Results 2026: कोणाचे पारडे जड? बंडखोरी अन् अपक्षांचे सावट; कशी आहेत ५ मतदारसंघांतील राजकीय समीकरणे

Maharashtra MLC Election Result News: विधान परिषदेच्या ५ मतदारसंघांसाठी मतमोजणीला प्रारंभ!; १८२ उमेदवारांचे भवितव्य पणाला
3

Maharashtra MLC Election Result News: विधान परिषदेच्या ५ मतदारसंघांसाठी मतमोजणीला प्रारंभ!; १८२ उमेदवारांचे भवितव्य पणाला

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.