Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका

Sai Dongar Deforestation : कर्जत-भीमाशंकर येथील साय डोंगरातील वृक्षतोडीवरून राज्यात चर्चा रंगली आहे. स्थानिकांच्या आंदोलनाला पर्यावरणप्रेमींसह राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळत असताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 27, 2026 | 08:22 PM
nileshchandra support raj thackeray saidongar

nileshchandra support raj thackeray saidongar

Follow Us
Follow Us:
  • साय डोंगरातील वृक्षतोडीविरोधात वातावरण तापलं
  • जैन मुनी निलेशचंद्र राज ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी होणार?
  • टोरंट प्रकल्पावरून स्थानिक, पर्यावरणप्रेमी एकजूट
 

कर्जत : कर्जत-भीमाशंकर परिसरातील साय डोंगरात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा आता अधिक चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून या कामाला विरोध होत असतानाच, याविषयावरून राजकीय नेत्यांनीदेखील सरकारला घेरलं असल्याचं दिसत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सरकारला खडेबोल सुनावत आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे. यावरूनच आता जैन मुनी निलेशचंद्र यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.  (Sai Dongar Deforestation)

जैन मुनी निलेशचंद्र यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पर्यावरणविषयक भूमिकेला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी बोलावल्यास आपण स्वतः आंदोलनात सहभागी होण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘झाडं आणि जीव वाचवण्यासाठी पुढे येणाऱ्यांना पाठिंबा’

साय डोंगरातील वृक्षतोडीवरून सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेशचंद्र मुनी यांनी भगवान महावीरांच्या ‘जिओ और जीने दो’ या विचाराचा उल्लेख केला. झाडे आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी राज ठाकरे आवाज उठवत असतील, तर त्यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

Karjat torrent Power Project : ओमराजे निंबाळकरांचा सरकारला घरचा आहेर, वृक्षतोडीवरून राजकारण पेटलं…

कबुतरांचा मुद्दा आणि जंगल वाचवण्याचा प्रश्न वेगळा असल्याचे सांगत, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी मांडली. कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसल्याचे सांगून, झाडे आणि जीव वाचवणाऱ्यांच्या पाठीशी समाज उभा राहील, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी होणार?

राज ठाकरे यांनी निमंत्रण दिल्यास कर्जतला जाऊन आंदोलनात सहभागी होण्याची तयारी असल्याचे निलेशचंद्र मुनी यांनी म्हटले आहे. कंपनी कोणतीही असली, तरी पर्यावरणाच्या मुद्द्यावर तिचे समर्थन करणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनीही साय डोंगराला भेट दिली आहे. राज ठाकरे या भागाला भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे राजकीय आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून लक्ष वेधले जात आहे.

टोरंट प्रकल्पावरून स्थानिकांचा विरोध

साय डोंगरातील वृक्षतोड आणि टोरंट प्रकल्पासंदर्भातील निर्णयांवर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. प्रकल्पाच्या जनसुनावणीत स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध असताना पुढील प्रक्रिया कशी राबवली जात आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला.

या मुद्द्यावर स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि काही राजकीय नेत्यांकडून विरोध नोंदवला जात आहे. आता वृक्षतोडीबाबत प्रशासनाची भूमिका काय राहते आणि आंदोलनाला पुढे कोणाचा पाठिंबा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Aaditya Thackeray : ‘मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही!’ साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

Web Title: Sai dongar deforestation jain muni nileshchandra support raj thyackeray vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • karjat news
  • Maharashtra Politics
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Karjat Saidongar Deforestation : साय डोंगरातील टोरंट प्रकल्पावरून महायुतीतच मतभेद; महेंद्र थोरवेंच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा विरोध
1

Karjat Saidongar Deforestation : साय डोंगरातील टोरंट प्रकल्पावरून महायुतीतच मतभेद; महेंद्र थोरवेंच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा विरोध

Maharashtra MLC Election Results 2026: कोणाचे पारडे जड? बंडखोरी अन् अपक्षांचे सावट; कशी आहेत ५ मतदारसंघांतील राजकीय समीकरणे
2

Maharashtra MLC Election Results 2026: कोणाचे पारडे जड? बंडखोरी अन् अपक्षांचे सावट; कशी आहेत ५ मतदारसंघांतील राजकीय समीकरणे

Maharashtra MLC Election Result News: विधान परिषदेच्या ५ मतदारसंघांसाठी मतमोजणीला प्रारंभ!; १८२ उमेदवारांचे भवितव्य पणाला
3

Maharashtra MLC Election Result News: विधान परिषदेच्या ५ मतदारसंघांसाठी मतमोजणीला प्रारंभ!; १८२ उमेदवारांचे भवितव्य पणाला

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.