Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज निष्ठा सहज विकल्या अन् तत्व फेकून दिली जातात…! बाळासाहेबांसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती आहे. यानिमित्ताने मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. राजकीय पार्श्वभूमीवर भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2026 | 11:46 AM
Raj Thackeray social media post on Balasaheb Thackeray 100th birth anniversary

Raj Thackeray social media post on Balasaheb Thackeray 100th birth anniversary

Follow Us
Close
Follow Us:
  • बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती
  • यानिमित्ताने मनसे नेते राज ठाकरेंची खास पोस्ट
  • बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय प्रवासवर केले भाष्य
Balasaheb Thackeray birth anniversary : मुंबई : शिवसेनाप्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची 100 वी जयंती आहे. यानिमित्ताने शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहाने आनंद साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक दिनी बाळासाहेब ठाकरेंसाठी मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. राज ठाकरे यांनी भावनिक साद घालून आठवणींना उजाळा दिला आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिले आहे. यामध्ये राज ठाकरेंनी लिहिले आहे की, स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब १०० वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेंव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा.

हे देखील वाचा : निवडणूक न लढवताही त्यांनी दिल्लीचे तख्त हलवले; बाळ ठाकरेंचे ‘असे’ रहस्य ज्यामुळे सरकारही होते हादरले

आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात, आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं . सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोकं टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा.

स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत रहावं हे दुर्मिळ. हे फक्त… pic.twitter.com/iDRAjiYWSh — Raj Thackeray (@RajThackeray) January 23, 2026

“बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे.”

राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल.

हे देखील वाचा : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राहणारे नेतृत्त्व

बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे ‘बाळासाहेब’ आणि ‘मराठी’ या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभर पण कमी होणार नाही. स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन ! अशी भावनिक पोस्ट राज ठाकरे यांनी लिहिली आहे.

Web Title: Raj thackeray social media post on balasaheb thackeray 100th birth anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • raj thackeray
  • shivsena

संबंधित बातम्या

Raj Thackeray News: माझा काका.. माझं बालपण…; दैनिक ‘सामना’तून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी
1

Raj Thackeray News: माझा काका.. माझं बालपण…; दैनिक ‘सामना’तून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी

Balasaheb Thackeray: निवडणूक न लढवताही त्यांनी दिल्लीचे तख्त हलवले; बाळ ठाकरेंचे ‘असे’ रहस्य ज्यामुळे सरकारही होते हादरले
2

Balasaheb Thackeray: निवडणूक न लढवताही त्यांनी दिल्लीचे तख्त हलवले; बाळ ठाकरेंचे ‘असे’ रहस्य ज्यामुळे सरकारही होते हादरले

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राहणारे नेतृत्त्व
3

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे : मराठी माणसाच्या हक्कासाठी उभे राहणारे नेतृत्त्व

KDMC Politics: आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस
4

KDMC Politics: आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.