Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commission: मतचोरी आज नाही तर अनेक वर्षांपासून सुरु; भाजपच्या समर्थकाने अखेर केले कबुल

Ramdas Athawale : राज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर रामदास आठवले यांनी यापूर्वी देखील मतचोरी होत असल्याचा आरोप केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 04, 2025 | 03:08 PM
Ramdas Athawale admits to scam in voter lists Maharashtra Political News

Ramdas Athawale admits to scam in voter lists Maharashtra Political News

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप
  • रामदास आठवले यांनी अनेक वर्षे मतचोरी होत असल्याचे कबुल केले
  • राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण

Ramdas Athawale: नवी मुंबई : राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली गेले. शेतकऱ्यांची घरे देखील वाहून गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. राज्य सरकारकडून पंचनामे करण्यात असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. मात्र शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्यात यावी यासाठी जोरदार आंदोलन देखील केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर देखील भाष्य केले. रामदास आठवले म्हणाले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने 1400 कोटी मदत दिलेली आहे, राज्य सरकारने 31 हजार कोटी जाहीर केलेले आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. कॉर्पोरेट संस्थांनी ही मदत घ्यावी. कोकणातील भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे,” असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे त्यांनी राज्यामध्ये सुरु असलेल्या मतदार याद्यांमध्ये घोटाळ्यावर भाष्य केले. विरोधी नेत्यांनी मतदार याद्यांमध्ये घोटाळा असून यावर आक्षेप घेतला आहे. याविरोधात महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ सुरु आहे. या प्रकरणावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मत चोरी ही आज होते असे नाही. मतचोरी अनेक वर्षांपासून होते, तरी मतचोरी होऊ नये अशी माझी इच्छा आहे, सत्याचा मोर्चा जरी काढला असला तरी या याद्या अगोदर पासून आहे, काँग्रेसचे सरकार असल्यापासून मतदार याद्या आहेत, त्यांनी इलेक्शन कमिशन कडे तक्रार करावी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे , शरद पवार व काँग्रेस पक्ष, शेकाप हे सगळे लक्ष एकत्र आले होते. त्यांनी या तक्रारी निवडणूक आयोगापुढे मांडायला हरकत नाही. तुमची सत्ता आल्यानंतर मतांची चोरी झाल्याचा आरोप आम्ही केला नाही,” असे म्हणत रामदास आठवले यांनी गोप्यस्फोट केली आहे. तसेच एकप्रकारे मतचोरी होत असल्याचे कबुल केले.

पुढे ते म्हणाले की, “आमची सत्ता आल्यानंतर आपण सांगता मतचोरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. मुंबई सारख शहर बदलत चाललं आहे, मतचोरी होऊ नये ही आमची भूमिका आहे, सत्याच्या मोर्चात दिलेल्या पुराव्यावर मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशनने खबरदारी घेऊन कार्यवाही करावी.” अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्रित येण्याची शक्यता आहे. याबाबत रामदास आठवले म्हणाले की, “उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आल्याने आमची महायुती अधिक मजबूत आहे. हे दोघे एकत्र आल्याने महाविकास आघाडीत फूट पडली आहे.काँग्रेस त्यांच्या सोबत यायला तयार नाही. त्यामुळे सगळी जी परिस्थिती आहे ती आमच्या बाजूने आहे. 40 टक्के मराठी मतदान त्यापैकी 20 , 22 टक्के मतदान आमच्या बाजूने होईल, 60 टक्के अमराठी मतदान आमच्या सोबत राहील. राज ठाकरे यांच्यात सभेला गर्दी करण्याची कुवत आहे, मात्र मतदान मिळवण्याची कुवत नाही. मुंबईत कौल त्यांच्या बाजूने जाणार नाही. मुंबईत महायुतीचा झेंडा फडकेल,” असा विश्वास एनडीए समर्थक केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Ramdas athawale admits to scam in voter lists maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Election Commission
  • political news
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis Bihar Election: खुर्चीत बसायला गेले अन्…; बिहारमध्ये फडणवीसांसोबत नेमकं काय घडलं?
1

Devendra Fadnavis Bihar Election: खुर्चीत बसायला गेले अन्…; बिहारमध्ये फडणवीसांसोबत नेमकं काय घडलं?

Bihar Election 2025: बिहारच्या निवडणुकीमध्ये आश्वासनांचा पाऊस; सरकारी तिजोरी वाढतोय बोजा
2

Bihar Election 2025: बिहारच्या निवडणुकीमध्ये आश्वासनांचा पाऊस; सरकारी तिजोरी वाढतोय बोजा

Local Body Elections: महायुती – महाविकास आघाडीचा गोंधळ शिगेला! पैठण नगरपरिषद निवडणूक ठरणार लक्षवेधी
3

Local Body Elections: महायुती – महाविकास आघाडीचा गोंधळ शिगेला! पैठण नगरपरिषद निवडणूक ठरणार लक्षवेधी

Maharashtra Politics: आशिष शेलारांनी केली निवडणूक आयोगाची पाठराखण; पुरावे दाखवत केली रोहित पवारांची पोलखोल
4

Maharashtra Politics: आशिष शेलारांनी केली निवडणूक आयोगाची पाठराखण; पुरावे दाखवत केली रोहित पवारांची पोलखोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.