Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : रामदास आठवलेंनी थेट शरद पवारांनाच दिली ‘ही’ मोठी ऑफर; राजकीय चर्चांना उधाण

शरद पवारांना थेट भाजपमध्ये जायचे नसेल, तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक भाजपसोबत घेऊन जाऊ. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 14, 2026 | 11:50 AM
भाजपमध्ये जायचे नसेल तर आरपीआयमध्ये या

भाजपमध्ये जायचे नसेल तर आरपीआयमध्ये या

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी शरद पवारांना मोठी राजकीय ऑफर दिली आहे. पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, तर आमच्यासोबत यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आठवले म्हणाले, शरद पवारांना थेट भाजपमध्ये जायचे नसेल, तर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक भाजपसोबत घेऊन जाऊ. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसवर टीका करताना आठवले म्हणाले की, पक्षात पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. आगामी काळात काँग्रेसचे राजकीय भविष्य फारसे मजबूत दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी अन्य पर्यायांचा विचार करावा, असेही त्यांनी सुचवले.

शरद पवार गटाचे विलीनीकरणासाठी प्रयत्न

दरम्यान, भाजप नेते आशिष देशमुख यांच्या विधानानेही राजकीय चर्चाना आणखी हवा मिळाली आहे. काही नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.

राजकीय चर्चांना उधाण

या विधानांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात संभाव्य आघाड्या, युती आणि पक्षविलीनीकरणाबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या विषयावर संबंधित प्रमुख नेत्यांची अधिकृत भूमिका आणि प्रतिक्रिया काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रामदास आठवले यांनी घेतली उदयनराजेंची भेट

राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिकांबाबत आणि आगामी काळातील राजकीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. जलमंदिर येथे झालेल्या या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थिती, महायुतीतील घटक पक्षांचे स्थान तसेच सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘मोदी मस्ट गो! मोदी सरकार नाही तर काँग्रेसच देशाला संकटातून वाचवू शकते,’ यशवंत सिन्हा यांचे मोठे वक्तव्य

Web Title: Ramdas athawale has made major offer directly to sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Ramdas Athawale
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Raj Thackeray: मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा
1

Raj Thackeray: मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Maharashtra Politics : जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगूल आता लवकरच वाजणार; सर्व निवडणुका डिसेंबरमध्ये…
2

Maharashtra Politics : जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगूल आता लवकरच वाजणार; सर्व निवडणुका डिसेंबरमध्ये…

Maharashtra Breaking News Live Updates Today: २४ तासांत निर्णय बदलला! मंत्र्यांना ऑनलाईन की मुद्रित वृत्तपत्रे?
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: २४ तासांत निर्णय बदलला! मंत्र्यांना ऑनलाईन की मुद्रित वृत्तपत्रे?

Ramdas Athawale is Back! अभिजित दीपकेसाठी संसदेत सादर केली खास कविता! म्हणाले ‘अमेरिकेतून जे आले चुपके-चुपके…’,
4

Ramdas Athawale is Back! अभिजित दीपकेसाठी संसदेत सादर केली खास कविता! म्हणाले ‘अमेरिकेतून जे आले चुपके-चुपके…’,

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.