Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranajagjitsinha Patil : “भाजपात येण्यापूर्वी ते आरोपी राष्ट्रवादीचेच होते…”, राणा पाटलांचे सुप्रिया सुळेंना खरमरीत पत्र

भाजपावर टीका होत असतानाही गंगणे यांच्या नावाला पक्षाकडून देण्यात आलेली पसंती भुवया उंचवायला लावणारी आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचा आरोप वारंवार होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2025 | 01:17 PM
"भाजपात येण्यापूर्वी ते आरोपी राष्ट्रवादीचेच होते...", राणा पाटलांचे सुप्रिया सुळेंना खरमरीत पत्र

"भाजपात येण्यापूर्वी ते आरोपी राष्ट्रवादीचेच होते...", राणा पाटलांचे सुप्रिया सुळेंना खरमरीत पत्र

Follow Us
Close
Follow Us:
  • तुळजापूरमधील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरण
  • राणाजगजितसिंह पाटलांचं सुप्रिया सुळेंना खरमरीत पत्र
  • भाजपात येण्यापूर्वी ते आरोपी राष्ट्रवादीचेच होते
शीतलकुमार शिंदे,धाराशिव : तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण माध्यमातून पेटले असताना मित्राचे अध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना खरमरीत पत्र लिहीत आत्मपरिक्षणासह स्वपक्षातील अशी उदाहरणे पाहण्याचा सल्ला दिला आहे. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीस नगराध्यक्षपदाची उमेदवारी भाजपाने दिल्याने आणि अन्य आरोपींना पक्षप्रवेश दिल्याने सध्या माध्यमातून मोठी चर्चा झडत आहे. यावर विनोद गंगने यांनीच प्रथम या प्रकरणाची तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी त्यांना त्यात अडकवले आहे. या प्रकरणाच्या खोलात जाऊन आपण माहिती घ्यावी. असा सल्लाही त्यांनी सुळे यांना दिला आहे.

“काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

आमदार पाटलांनी पत्रात नमूद केले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार (आत्या) ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान असल्याचे सुरुवातीलाच नमूद करून, काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात.

भाजपात येण्यापूर्वी ते राष्ट्रवादीचे होते

तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादीचे (शरद पवार) तुळजापूर शहरातील प्रमुख होते, त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते. त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते.

माहिती न घेता मीडिया ट्रायल

आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारं आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत आपण सलग दोन वेळा जे वक्तव्य केले आहेत, त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारणाने प्रेरित ‘मीडिया ट्रायल’ करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचं स्पष्ट होतंय.

प्रकरण उघडकीस आणणाऱ्यासच पोलिसांनी गोवले

विधानसभा निवडणुकीच्या काळात तुळजापूर शहरातील स्थानिक माता-भगिनींनी शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती मला दिली. त्याचवेळी हे सगळं उध्वस्त करून टाकण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. त्यानुसार मी खोलात जाऊन याबाबत माहिती मिळविली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मी स्वतः मेसेज करून याबाबतची माहिती पुरवली व पाठपुरावा केला. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी विनोद गंगणे यांना जोडून दिले. या व्यक्तीने हे सगळे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. दुर्दैवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत. कोण खरे गुन्हेगार आहेत? हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच.

निविदेत सहभागी होणे चुकीचे कसे काय ?

अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कोणीही सहभागी झाले नाही. तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टने त्यात सहभाग घेतला. यात नेमकं चुकीचं काय झाले आहे? जरा आपण सांगू शकलात, तर बरं होईल ! म्हणजे आपलं नेमकं म्हणणं काय हे कळेल.

शंका दूर करण्यासाठी चर्चेची तयारी

आपल्या अजूनही काही शंका असतील, तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी आहे. असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हे पत्र समाज माध्यमावरून प्रसारित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच! थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर जल्लोषावर रोहित पवारांचे टीकास्त्र 

💡

Frequently Asked Questions

  • Que: राणाजगजितसिंह पाटील कोण आहेत?

    Ans: हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आले असून महाराष्ट्रातील तुळजापूर येथील विद्यमान आमदार आहेत.

  • Que: सुप्रिया सुळे यांनी आरोप काय आहेत?

    Ans: तुळजापूर येथील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे हे शहरात गाजलेल्‍या ड्रग्‍ज प्रकरणात आरोपी असल्‍याने राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या खा. सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्‍यमंत्र्यांना पत्र लिहीले आहेत.

  • Que: पवार–पाटील परिवाराचे काय संबंध?

    Ans: पवार–पाटील परिवारातील नाते, राजकीय भूमिका आणि बदलती समीकरणे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Ranajagjitsinha patil letter to supriya sule over accusation of sheltering accused of tuljapur drugs case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Maharashtra Political
  • supriya sule

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ
1

Maharashtra Politics : हेच बघायचं बाकी होतं! भाजप-काँग्रेस युती, शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवलं? अंबरनाथमध्ये राजकीय उलथापालथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.