(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्ती ओरला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात अमली पदार्थ विरोधी कक्षाने ओरीला समन्स बजावले आहेत. पोलिसांनी ओरीला उद्या (२० नोव्हेंबर २०२५) सकाळी १० वाजता अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच आता या प्रकरणामुळे ओरी जास्त चर्चेत आला आहे.
तसेच, या संपूर्ण प्रकरणी मुंबई पोलिसांनी २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने उघड केले की तो भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करतो आणि त्यांना ड्रग्ज पुरवतो. आता याच प्रकरणी ओरला देखील पोलिसांनी समन्स बजावले आहेत.
Miss Universe 2025मध्ये धक्कादायक वाद, जज आणि कंटेस्टंटच्या अफेअरचा आरोप, दोन जणांचे राजीनामे
ड्रग्ज प्रकरणात या सेलिब्रिटींची नावे आली समोर
आरोपीने दावा केला की त्याने यापूर्वी नोरा फतेही, श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, झीशान सिद्दीकी, ओरी उर्फ ओरहान, अब्बास मस्तान, लोका आणि इतर अनेकांसोबत भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या. आरोपीने असेही कबूल केले की तो या पार्ट्यांमध्ये वैयक्तिकरित्या सहभागी झाला होता आणि या आणि इतर व्यक्तींना ड्रग्ज पुरवत होता. पोलीस आता या दाव्यांची चौकशी करत आहेत आणि या संदर्भात ओरीला समन्स बजावण्यात आले आहे.
ओरी हा एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे जी अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत वेळ घालवताना दिसते. तसेच तो अनेक सेलिब्रेटी कार्यक्रमादरम्यान देखील दिसला आहे. तसेच त्याचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.
ड्रग्ज प्रकरणात नोरा फतेहीने स्पष्टीकरण
ड्रग्ज प्रकरणात नोरा फतेहीचे नाव अडकल्यावर नोरा फतेहीने स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर लिहिले, “तुमच्या माहितीसाठी, मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी सतत काम करत असते. माझे वैयक्तिक आयुष्य नाही. मी अशा लोकांशी स्वतःला जोडत नाही. जर मी वेळ काढला तर मी दुबईतील माझ्या घरी किंवा माझ्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवणे पसंत करते. मला वाटते की मी एक सोपा निशाणा आहे. पण मी हे पुन्हा होऊ देणार नाही.”
मस्ती 4 मधून काढून टाकले ‘हे’ सीन, 6 डायलॉग्समध्ये केले बदल, सेन्सॉर बोर्डाने दिले ‘A’ सर्टिफिकेट
“लोक माझे नाव कलंकित करत आहेत…” – नोरा
अभिनेत्री नोराने पुढे लिहिले, “लोकांनी मला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी खोटे बोलले, पण काहीही काम झाले नाही. जेव्हा लोक माझे नाव कलंकित करत होते, तेव्हा मी गप्प राहिले. पण आता माझे फोटो आणि नाव ज्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही त्या गोष्टींपासून दूर ठेवा. हे खूप महाग पडू शकते.” असे लिहून नोराने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
Ans: ओरी हा एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
Ans: या प्रकरणात मुंबई पोलिसांनी Orry ला ₹252 कोटींच्या मेफेड्रोन (MD) ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवला आहे.






