डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे 'हे' अनमोल विचार जीवन जगताना देतील प्रेरणा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे निर्माता म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी अनेकांना जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग सापडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बाबासाहेबांनी आपले आयुष्य दलित समाजाच्या जडणघडणीसाठी समर्पित केले. याशिवाय त्यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क दिला. आर्थिक आणि सामाजिक भेदभावाचा सामना करत बाबासाहेबांनी संपूर्ण देशासाठी संविधान लिहिले. त्यांचे प्रेरणादायी विचार अजूनही सगळ्यांचं प्रेरित करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काही प्रेरणादायी विचारांबद्दल सांगणार आहोत. हे विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील.(फोटो सौजन्य – pinterest)
Dinvishesh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 31 मार्चचा इतिहास
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार, नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.” नशिबावर निर्भर राहू नका.
माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेला प्रसिद्धीची आवश्यकता असते, जसे एखाद्या रोपाला पाण्याची आवश्यकता असते, अन्यथा ते कोमेजते आणि मरते.
इतिहास लिहिणारा इतिहासकार अचूक, निःपक्षपाती आणि प्रामाणिक असला पाहिजे. आयुष्य मोठे नसून उत्तम असले पाहिजे.
जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य मिळवत नाही, तोपर्यंत कायद्याने तुम्हाला दिलेले कोणतेही स्वातंत्र्य तुमच्यावर अन्याय आहे. शिक्षण हे पुरुषांइतकेच महिलांसाठीही आवश्यक आहे.
कायदा आणि सुव्यवस्था हे राजकीय पक्षासाठी औषध आहे आणि जेव्हा राजकीय पक्ष आजारी पडतो तेव्हा औषध दिले पाहिजे. तुमच्या नशिबापेक्षा तुमच्या ताकदीवर विश्वास ठेवा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार, दुसऱ्याच्या सुख दुखाःत भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.”इतर लोकांना मदत करत राहा”. जर तुम्ही एकमेकांच्या दुखत सहभागी झालात तर जीवनातील बऱ्याच संकटांसोबत लढण्याची तुम्हाला ताकद मिळेल. इतरांच्या दुःखातून तुम्ही काहींना काही नवीन गोष्टी शिकाल.
इतिहासाची जाणीव प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे. कारण इतिहासात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देत देशासाठी लढा दिला आहे. जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत, असे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटले आहे.
आजही लाखो तरुणांचे आयुष्य बदलतात बाबासाहेबांचे ‘हे’ विचार; महामानवाची विचारसरणी
“हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.”- बाबासाहेब आंबेडकर. संविधानाने तुम्हाला दिलेले हक्क सोडून देण्याऐवजी ते मागून मिळवावे. तुम्हाला देण्यात आलेले हक्क हे तुमच्या रक्षणासाठी आहेत. याशिवाय नवनवीन गोष्टी शिकत राहिल्यामुळे माणूस सक्षम बनतो.