Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rasane vs Dhangekar : मित्रपक्षामध्ये आले तरीही वाद काही संपेना! धंगेकर विरुद्ध रासने संघर्ष सुरुच

रवींद्र धंगेकर यांनी कॉंग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्याचे राजकारण बदलले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सामील होऊन देखील धंगेकर विरुद्ध रासने असा संघर्ष सुरु आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2025 | 03:52 PM
Ravindra Dhangekar targets BJP MLA Hemant Rasane by flexing his muscles Pune Politics

Ravindra Dhangekar targets BJP MLA Hemant Rasane by flexing his muscles Pune Politics

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्याच्या राजकारणामध्ये मागील दोन वर्षापासून मोठे बदल झाले आहेत. दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिव़डणूक झाली. या एका मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने अक्षरशः संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. यामध्ये हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी चुरशीची लढत झाली होती. रासने विरुद्ध धंगेकर अशा लढतीमध्ये पोटनिवडणूकीमध्ये रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली. तर दीड वर्षात लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रासनेंनी भाजपचा गड पुन्हा मिळवला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव यामुळे राज्याचे राजकारण बदलले. अनेक नेत्यांनी महायुतीची साथ दिली. तर पुण्याचे कॉंग्रेसचे नेते असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. मागील आठवड्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यामुळे आता रवींद्र धंगेकर हे शिवसेनेमध्ये आणि हेमंत रासने हे भाजपमध्ये आहेत. महायुतीच्या मित्रपक्षामध्ये असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये अद्याप शत्रुत्व संपलेले नाही.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्समध्ये भाजपचे विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केल्याचे पहायला मिळत आहे. कसबा विधानसभेतील नागरिकांना पाण्याचे मीटर बसल्यावरुन त्यांनी लक्ष्य केले आहे. रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत आमदार हेमंत रासने यांना लक्ष्य केले आहे. यामुळे धंगेकर यांनी पक्षांतर केले असले तरी त्यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत वादंग तसेच आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी राजकीय लढत आजही कसबामध्ये दिसून येत आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्य वाचण्यासाठी क्लिक करा

माझ्या कसबा विधानसभेतील नागरिकांना नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करणार, असे आश्वासन देऊन विधानसभा निवडणुकीत त्यांनी मते घेतली. आता प्रत्यक्षात मात्र घरोघरी पाण्याचे मीटर बसवून त्यांच्याकडून अन्यायकारक पाणीपट्टी वसूल करण्यात येत आहे. कसब्यातील सुज्ञ जनता त्यासोबत झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी बॅनरवर लिहिले आहे. आता सत्ताधारी पक्षामध्ये असून देखील धंगेकर यांनी लावलेल्या फ्लेक्समुळे पुण्यात राजकारण चांगलेच तापले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी चौथ्यांदा पक्षांतर केले. त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांची ओळख कामाने निर्माण केली आहे. यांच्या पोटनिवडणुकीवेळी मी तिकडे होतो. ती निवडणूक गाजली पण, सगळी फौज लागली तरी धंगेकरांनी बाजी मारली आणि लोकसेवक काय असतो हे दाखवले. आता तुम्ही शिवसेनेत आला आहात, त्यामुळे लोकांना कळेल हू इज धंगेकर?” अशी मिश्किल टिप्पणी एकनाथ शिंदेंनी केली होती.

Web Title: Ravindra dhangekar targets bjp mla hemant rasane by flexing his muscles pune politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Hemant Rasane
  • pune news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
1

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
2

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
3

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
4

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.