Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावरून आमदार रोहित पवार यांनी मोठी विधानं केली आहेत. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना एकटं पाडलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर पवार कुटुंबात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.

  • By विवेक
Updated On: Nov 03, 2026 | 08:51 PM
Rohit Pawar

Rohit Pawar

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
  • पवार कुटुंबातील राजकारणावर भाष्य
  • पार्थ पवार, सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जात असल्याचा दावा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना आता नवं वळण मिळालं आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पवार कुटुंबातील कथित मतभेदांवरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच, अजित पवार यांनी काही नेत्यांबाबत आपल्याकडे नाराजी व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत अंतिम निर्णय दिलेला नसल्याने आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हाच असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलेल्या नेत्यांबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, या सर्व नेत्यांना शरद पवार यांनीच राजकारणात संधी दिली होती. मात्र, आता पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना एकटं पाडलं जात असल्याचं चित्र आहे.

दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाचा दणका! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

अजितदादांनी स्वतः सांगितलं होतं, रोहित पवारांचा दावा

रोहित पवार यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला. छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचा अपवाद वगळता काही नेत्यांकडून अजितदादांना त्रास दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असं रोहित पवार म्हणाले.

तसंच, पक्षातील काही नेत्यांना पुन्हा मंत्रिपदाची किंवा अर्थ खात्याची अपेक्षा असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. पार्थ पवार आणि पक्षातील काही नेत्यांमध्ये संवाद नसल्यामुळे त्यांचं नियंत्रण कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपकडून दोन भावांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न?

काका-पुतण्यांमध्ये भाजपने वाद निर्माण केला आणि आता दोन भावांमध्येही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं रोहित पवार म्हणाले. जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं.

दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी देऊन कोणी आमच्यासोबत येत असेल, तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली. मात्र, भाजपच्या धोरणांना विरोध न करता सोबत येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आमचा विरोध असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एकूणच, रोहित पवारांच्या या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणि पवार कुटुंबातील संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत.

केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचा भाजपसोबत मोठा संघर्ष; ‘ती’ बाब ठरली वादाचे कारण

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित पवारांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांबाबत काय विधान केलं?

    Ans: पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. त्यांना जवळच्या नेत्यांच्या राजकीय हालचाली समजून घेण्याचा सल्लाही दिला.

  • Que: अजित पवारांनी कोणत्या नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती, असा रोहित पवारांचा दावा आहे?

    Ans: छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचा अपवाद वगळता काही नेत्यांकडून अजितदादांना त्रास होत असल्याचं त्यांनी स्वतः सांगितल्याचा दावा रोहित पवारांनी केला.

  • Que: भाजप सोडून राष्ट्रवादीसोबत येणाऱ्यांबाबत रोहित पवारांची भूमिका काय आहे?

    Ans: भाजपच्या धोरणांना विरोध करून राष्ट्रवादीसोबत येणाऱ्यांना आमचा विरोध नाही. मात्र, भाजपच्या भूमिकेला विरोध न करणाऱ्यांना आम्ही विरोध करू, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Web Title: Rohit pawar big statement parth pawar sunetra pawar bjp politics vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • BJP
  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Pune Metro: अभिमानाची बातमी! देशातील पहिली महिला संचालित मेट्रो पुण्यात; १०० महिला ट्रेन पायलट सज्ज
1

Pune Metro: अभिमानाची बातमी! देशातील पहिली महिला संचालित मेट्रो पुण्यात; १०० महिला ट्रेन पायलट सज्ज

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी
2

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?
3

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?

Pratap Sarnaik : सरनाईकांविरोधात भाजपचे आंदोलन; शिवसेना महिला आघाडीने आरसे दाखवत दिले प्रत्युत्तर!
4

Pratap Sarnaik : सरनाईकांविरोधात भाजपचे आंदोलन; शिवसेना महिला आघाडीने आरसे दाखवत दिले प्रत्युत्तर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.