rohit pawar happy and congress upset over raj uddhav Thackeray come together
Maharashtra Politics :मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. तर तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू हे एकत्रित आले आहेत. मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. यानंतर मात्र राजकीय वर्तुळामध्ये ठाकरे बंधू एकत्रित येण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र ठाकरे गटाची राज्यामध्ये महाविकास आघाडीसोबत युती आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीमधील एका बाजूला आनंद आहे तर दुसऱ्या बाजूला नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक शाळांमधील अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्ती करण्याचा महायुती सरकारने प्रयत्न केला. पहिल्यांदा सक्ती आणि नंतर पर्यायी भाषा देत हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. यावरुन मनसे नेते राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांना उद्धव ठाकरे यांनी देखील साथ दिली. राज-उद्धव हे ठाकरे बंधू तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आले. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी विजयी सभा घेतली. या सभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते देखील उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजयी सभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जितेंद्र आहाड देखील उपस्थित होते. मंचावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना काकांशेजारी त्यांनी उभे केले. ना झेंडा ना अजेंडा अशा विजयी सभेला राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. मात्र कॉंग्रेस नेत्यांची अनुपस्थिती ही लक्षात येत होती. राज-उद्धव यांचे दोन दशकांनंतर एकत्रित आलेले फोटो देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेअर केले होते. मात्र कॉंग्रेस नेत्यांनी यावर चुप्पी साधत आपली अबोल नाराजी व्यक्त केली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आता उद्धव ठाकरे यांचा 65 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस हा स्पेशल ठरला. राज ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीवर येत उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान हे विलक्षण होते. त्याचबरोबर राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर मातोश्रीवर आले. मातोश्रीमधील दोन्ही नेत्यांचे फोटो हे जोरदार व्हायरल होत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोफ्रेमच्या पुढे राज व उद्धव एकत्रित उभे आहे.
दोघा ठाकरे बंधूंच्या मागे असलेल्या फोटोतून स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब हे एकप्रकारे त्यांना आशीर्वादच देतायेत की, भाऊ म्हणून तुम्ही दोघं असेच सोबत रहा…!@OfficeofUT @RajThackeray @ShivSenaUBT_ @mnsadhikrut #Thackeray pic.twitter.com/oDDk0IlO62
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2025
अत्यंत बोलक्या अशा या राजकीय फोटोवर देखील राष्ट्रवादी शऱद पवार गटाच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, दोघा ठाकरे बंधूंच्या मागे असलेल्या फोटोतून स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब हे एकप्रकारे त्यांना आशीर्वादच देतायेत की, भाऊ म्हणून तुम्ही दोघं असेच सोबत रहा…! अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी दिल्या आहेत.
कॉंग्रेसकडून अबोल नाराजी
त्यामुळे ठाकरे बंधू हे दोन दशकांनंतर मागील वाद विसरुन एकत्र येत आहेत. यावर महाविकास आघाडीमध्ये एक घटक खूश असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने खूश आहेत. तर कॉंग्रेस पक्षाचे नेते मात्र नाराज असल्याचे दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचे एकत्रित येणे महायुतीला डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेस देखील यावरुन अबोल नाराजी व्यक्त करत आहे.