
Rohit Pawar, Disha Salian Case CBI FIR, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput,
पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी, चाकणमधील सुविधांच्या दुरवस्थेविरोधात आणि समस्यांवर ज्या उद्योजकांनी आवाज उठवला, त्यांना उद्योगमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन करून धमक्या दिल्या जात आहेत. ‘तुम्ही का बोलताय? तुमच्या धंद्याला अडचणी निर्माण होतील’ असा दबाव टाकून उद्योजकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
ज्या कंपन्या बंद होत आहेत किंवा बाहेर जात आहेत, त्या कधी सुरूच झाल्या नव्हत्या, हे मुख्यमंत्र्यांचे विधान हास्यास्पद आहे. उद्योगमंत्र्यांनी इतर राजकीय उद्योग बंद करावेत आणि माझ्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी. महाराष्ट्रातून किती आणि कोणत्या कंपन्या गुजरात किंवा इतर राज्यात गेल्या, याचे सर्व पुरावे मी आकडेवारीसह सादर करायला तयार आहे, असे आव्हान त्यांनी दिले.
२०१४ नंतर चाकण परिसरात एकही नवीन मोठी कंपनी आली नसल्याचा दावा करत पवार म्हणाले, “दावोसमध्ये १० बाय १० च्या खोलीत कार्यालय असणाऱ्या कंपन्यांसोबत करार करून हजारो कोटींची गुंतवणूक आणि नोकऱ्यांचे खोटे दावे केले जातात. प्रत्यक्षात किती उद्योग सुरू झाले? याचा हिशेब सरकारने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली
चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या आणि कामगारांच्या समस्या अत्यंत गंभीर बनल्या असून, या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः येत्या ४ ते ५ दिवसांत चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहितीही रोहित पवार यांनी दिली.