
Rohit Pawar, NEET UG, NEET Re Exam, Paper Leak, UG NEET Re Exam Paper Leak Gujarat Link
NEET Re-Exam Paper Leak: NEET 2026 परीक्षेतील कथित गैरप्रकारांवरून देशभरात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर झालेल्या फेरपरीक्षेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाचे ‘गुजरात कनेक्शन’ असल्याचा दावा केला आहे.
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांवरून आधीच देशभरात तीव्र आंदोलन झाले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या फेरपरीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित पवार यांनी केलेल्या ताज्या आरोपांमुळे हा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रोहित पवार यांनी नीट पेपरफुटी आणि फेरपरीक्षा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणामागील कथित ‘गुजरात कनेक्शन’चा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार यांनी ट्विटर एक्सवरून एक खळबळजनक ट्विट करत युजी नीटच्या फेर परीक्षेवरही मोठा आक्षेप घेतला आहे.फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस अगोदरच फुटला आणि त्याचे गुजरातशी खास कनेक्शन आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
“NEET पेपर लीक झाल्यानंतर जी नवीन फेरपरीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा पेपर देखील ३ दिवस आधीच गुजरातमधून फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हे सत्य असेल तर खूप अवघड आहे. तपास यंत्रणानी यासंदर्भात त्वरित खुलासा करावा आणि पेपर फुटला असेल तर कुठल्याही दबावाला बळी न पडता यामधील रॅकेट उघडकीस आणावं, ही विनंती. या पेपरफुटीसंदर्भात पुढं आलेले स्किन शॉट, मेल, संभाषण हे सगळं सोबत दिलेल्या लिंकवर गेल्यास पहावयास मिळेल.” असे ट्वीट करत रोहित पवारांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.
रोहित पवार यांनी आरोपांशी संबंधिक काही कागदपत्रे आणि एक ईमेलदेखील ट्विट केले आहेत. यासंदर्भात या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शच तपास व्हावा, अशी मागणीगी त्यांनी केली आहे. रोहित पवारांनी त्याचे स्क्रीन शॉट, मेल, संभाषण या सगळ्यांची लिंकही ट्विट केली आहे. जर नीटचा फेरपरीक्षेचा पेपरदेखील परीक्षेच्या आगोदरच गुजरातमध्ये फुटला असेल तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा दृ्ष्टीने ही चिंताजनक आणि गंभीर बाब आहे. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
एकीकडे संसदेक परीक्षासुधारणा विधेयकावर चर्चा होत असताना दुसरेच मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे वारंवार संसदेचे कामकाज तहकूब करावे लागत आहेत. पण नीटच्या फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा रोहित पवारांचा दावा खरा असेल तर विरोधकांना सरकारविरोधात आयतं कोलीत मिळणार असल्याचीही चर्चा आहे.