Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वराज्य पक्ष’ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टच सांगितलं

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचा स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 19, 2025 | 05:51 PM
Sambhajiraje Chhatrapati press participation of Swarajya Party in local body elections

Sambhajiraje Chhatrapati press participation of Swarajya Party in local body elections

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निकाल दिला आहे. येत्या चार महिन्यांमध्ये महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या निवडणुका एकत्र लढणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “इतके फटके बसलेत त्यातून बाहेर पडणे अवघड आहे. त्यामुळे स्वराज्य पक्षाने निवडणूक लढवणे असे काही अद्याप ठरवलेले नाही. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू. निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून विचार विनिमय सुरू आहे,” अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे संभाजीराजे छत्रपती यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “प्रामाणिकपणे राजकीय पक्ष चालवणे आजच्या घडीला अवघड आहे. राजकारण आणि परखड बोलणे याचा मेळ बसत नाही. राजकारण हा पैशाचा खेळ, आमच्याकडे पैसा नाही. पक्ष संघटन सोपे नाही पण काम करत राहणार. राजकारणात टिकणं हे खूप अवघड काम आहे,” अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.

ठराविक दोघे जणच याबाबत बोलतात

रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “कायदेशीर मार्गाने किल्ले रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी. या वाघ्या कुत्रा संदर्भात कोणत्याच इतिहास संशोधक, अभ्यासाकडे पुरावे नाहीत, हे राज्य सरकारला स्पष्ट दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूला तितकीच मोठी समाधी उभा करणे ही दुर्दैवाची बाब आहे. 6 जून नंतर राज्य सरकारकडून समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. सर्व पक्षाच्या आणि आघाडीच्या सदस्यांना या समितीत घ्यावे. कायदा हातात घेऊन कोणतेही कार्य करणार नाही. ठराविक दोघे जणच याबाबत वक्तव्य करत आहेत,” असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हे महाराष्ट्राला परवडणार नाही

परळीमधील सध्या शिवराज दिवटे यांना झालेल्या मारहाणीमुळे वातावरण तापले आहे. समाधान मुंडेच्या गॅंगकडून ही मारहाण झाली असून याचा धक्कादायक असा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. याबाबत संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “वाल्मिकी कराडला जेलमध्ये घातल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत झालं असं म्हणता येणार नाही.  कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडली आहे. हे सुसंस्कृत महाराष्ट्र नाही. हे महाराष्ट्राला परवडणार नाही. महाराष्ट्रात अशा गोष्टी चालू न देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालावे.  कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष लक्ष त्यांनी घालावं,” असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Sambhajiraje chhatrapati press participation of swarajya party in local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Local Body Elections
  • political news
  • Sambhajiraje Chhatrapati

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.