Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election Result 2026 : महाविकास आघाडीला धक्का! सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह व्यंकोजीराजे जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजय मिळवला. सांगलीतील तरुण भारत व्यायाम मंडळ येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी पार पडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 22, 2026 | 11:57 AM
महाविकास आघाडीला धक्का! सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय

महाविकास आघाडीला धक्का! सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा झेंडा; धैर्यशील कदमांचा दणदणीत विजय

Follow Us
Follow Us:
  • महायुतीचे धैर्यशील कदम यांचा दणदणीत विजय
  • अभयसिंहराजे जगताप यांचा पराभव
  • सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६
सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह व्यंकोजीराजे जगताप यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजय संपादन केला. तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे सोमवारी पार पडलेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला.

22 जून 2026 रोजी सकाळी ८ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात स्ट्राँग रूम उघडण्यात आली. त्यानंतर चिठ्ठीद्वारे मतमोजणी टेबलांवरील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली. मतपेट्या मतमोजणी टेबलांवर आणून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आणि नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.

राज्यात भाजपचा जलवा कायम; विधान परिषद निकालाने शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या, काँग्रेस-शिवसेनेची कामगिरी कशी राहिली?

सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण १२ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले होते. एकूण ८९५ मतदारांपैकी ८९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे या निवडणुकीत ९९.८९ टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते.
मतमोजणीसाठी पाच टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या टेबलवर आठ गठ्ठे तर उर्वरित चार टेबलांवर प्रत्येकी सात गठ्ठ्यांची मोजणी करण्यात आली. सर्व ८९४ मतपत्रिकांचा ताळमेळ जुळल्यानंतर मतपत्रिकांची सरमिसळ करून २५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्यात आले. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व शिपाई नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय राखीव कर्मचारी, रांग अधिकारी, हौद अधिकारी आणि टॅब्युलेशन पथकाचीही नियुक्ती करण्यात आली होती.

मतमोजणीअंती महायुतीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना ५९३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह व्यंकोजीराजे जगताप यांना २९२ मते मिळाली. अपक्ष उमेदवार किशोर रणजंत धुमाळ यांना एकही मत मिळाले नाही. मतमोजणीत ९ मते बाद ठरली. त्यामुळे एकूण ८८५ वैध मतांपैकी कदम यांनी ३०१ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळविला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या मतदानावर आधारित या निवडणुकीत महायुतीने आपली ताकद सिद्ध करत हा मतदारसंघ कायम राखला आहे. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत धैर्यशील कदम यांचे अभिनंदन केले.

Solapur MLC Result : सोलापुरात कमळ फुलले! भाजपचे राजेंद्र राऊत यांना 483 मते, देशमुखांचा पराभव

एकूण उमेदवारांना किती मते

धैर्यशील कदम (महायुती)- ५९३
अभयसिंह जगताप (म.वि.आ)- २९२
किशोर धुमाळ- ०
बाद मते- ९
वैध मते- ८८५
विजयाचा फरक- ३०१
मतदान : ८९४ / ८९५ (९९.८९ टक्के)

Web Title: Sangli satara mlc election result dhairyashil kadam wins mahayuti defeats abhaysinh jagtap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • BJP
  • MLC Election Result 2026

संबंधित बातम्या

व्हायरल ऑडिओ क्लिपचं प्रकरण भोवलं, विजय चाैधरींंना अटक; ‘या’ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
1

व्हायरल ऑडिओ क्लिपचं प्रकरण भोवलं, विजय चाैधरींंना अटक; ‘या’ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही; भाजपच्या आमदाराचा दिपकेंना इशारा
2

आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही; भाजपच्या आमदाराचा दिपकेंना इशारा

Ahilyanagar news: अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे
3

Ahilyanagar news: अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे

Maharashtra Politics: महायुतीच्या फोडाफोडीत मनसेची मुसंडी, भाजपला धक्का देत पदाधिकाऱ्यांची ‘घरवापसी’!
4

Maharashtra Politics: महायुतीच्या फोडाफोडीत मनसेची मुसंडी, भाजपला धक्का देत पदाधिकाऱ्यांची ‘घरवापसी’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.