Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 कोटींच्या ऑफरच्या दाव्यावर आमदार धीरज लिंगाडे यांची पहिली प्रतिक्रिया; ‘राऊतांचा दावा पूर्णपणे खोटा’

संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून 20 कोटींची ऑफर आल्याचा दावा केल्यानंतर काँग्रेसचे विधान परिषद आमदार धीरज लिंगाडे यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांचा दावा फेटाळत त्यांनी मला कोणतीही ऑफर आलेली नसल्याचे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jul 05, 2026 | 04:19 PM
20 कोटींच्या ऑफरच्या दाव्यावर आमदार धीरज लिंगाडे यांची पहिली प्रतिक्रिया; 'राऊतांचा दावा पूर्णपणे खोटा'

20 कोटींच्या ऑफरच्या दाव्यावर आमदार धीरज लिंगाडे यांची पहिली प्रतिक्रिया; 'राऊतांचा दावा पूर्णपणे खोटा'

Follow Us
Follow Us:

राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराला फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबईत रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेतील आमदार धीरज लिंगाडे यांचे नाव घेत, त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा केला. यावरून आता आमदार धीरज लिंगाडे यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी राऊतांचा दावा फेटाळून लावला आहे.

धीरज लिंगाडे यांचा पलटवार

याबाबत बोलताना आता आमदार धीरज लिंगाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला याबाबत आज सकाळी समजले. संजय राऊत महाविकास आघाडीचे नेते आहेत. यांच्या विधानाने मला आश्चर्य वाटले. ते जे काही बोलले ते पूर्णपणे खोटे आहे. मला अशी कोणतीही ऑफर आलेली नाही. माझ्या संदर्भात जो काही दावा करण्यात आला तो खोटा आहे. मला कोणत्याही राजकीय पक्षाची ऑफर आली नाही मी रुग्णालयातदेखील भरती नाही,” असे ते म्हणाले.

Sanjay Raut: मविआचा आणखी एक आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींच्या ऑफरचा संजय राऊत यांचा दावा, भाजपचं प्रत्युत्तर

काय म्हणाले होते संजय राऊत ?

संजय राऊत म्हणाले, “माझ्या कानावर आले आहे की धीरज लिंगाडे यांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत आमदारकीचं आश्वासनही त्यांना देण्यात आलं आहे. ही घटना काल-परवाची आहे.”

राऊत यांनी हा आमदार ठाकरे गटाचा नसून काँग्रेसचा असल्याचे स्पष्ट करत, महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवरही जोरदार टीका केली. “तुमच्या हातात अफाट सत्ता, यंत्रणा आणि पैसा आहे. पण हा पापाचा पैसा आहे, तो कुणालाही पचणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “मोदी अमर आहेत का? अमित शाह अमर आहेत का? फडणवीस आणि शिंदे अजरामर आहेत का?” असा सवाल करत त्यांनी सत्तेच्या अहंकारावरही निशाणा साधला.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’

भाजपची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या आरोपांवर भाजपचे आमदार पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, कोणत्याही लोकप्रतिनिधीबद्दल पुराव्याशिवाय अशा प्रकारचे आरोप करणे योग्य नाही. “संजय राऊत यांच्या अशाच वक्तव्यांमुळे त्यांच्या पक्षातील लोक त्यांना सोडून जात आहेत,” असा पलटवार भोयर यांनी केला.

Web Title: Sanjay raut 20 crore offer claim dhiraj lingade first reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
1

Sanjay Raut on Purnekar and CJP Protest: प्रदीप पुर्णेकरांचा खून पचू देणार नाही! अमित शाहांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द
2

Pradeep Purnekar Murder : उद्धव ठाकरे थेट पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला, ‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत’ म्हणत दिला मोठा शब्द

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप
3

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
4

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.