
Sanjay Raut Nitesh rane
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. आधीच निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग होत असतानाच आता सिंधुदुर्गातील 900 कोटींच्या कथित जमीन व्यवहारावरून पुन्हा आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोकणातील एका मंत्र्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राऊतांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता हि टीका केली असल्याचे बोलले जात आहे. त्यातच, राऊतांच्या आरोपांनंतर नितेश राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नितेश राणे यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावत आधी चौकशीचा अहवाल येऊ द्या, अशी भूमिका मांडली. चुकीचं काही झालेलं नाही, असा दावा करत त्यांनी राजकीय आरोप करण्यापेक्षा संबंधित जीआर आणि सरकारी निर्णय समजून घेण्याची गरज असल्याचं सांगितलं.
राणे यांनी यावेळी राऊतांवर जोरदार शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “कोणी चुकीचं केलेलं नाही. आधी अहवाल येउद्या.. त्या दिवशी संजय राऊतांच तोंड काळं करण्यासाठी कुठेना कुठे शोधावे लागेल.”
Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
दरम्यान, या जमीन व्यवहाराची चौकशी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सुरू असल्याचं वृत्त आहे. चौकशीत काही गैरप्रकार आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी भूमिका राणेंनीही मांडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात चौकशीचा अहवाल काय सांगतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
आपल्या ‘X ‘ अकाऊंटवरून याप्रकाराबाबत भाष्य करत नितेश राणे म्हणाले, “आज संजय राऊत जी नी सिंधुदुर्ग जमिनी व्यवहारा बदल योग्य मुद्दा घेतला आहे.. बिलकुल मागे बघू नका .. बोलत रहा .. मग बघा कोणाचे वस्त्रहरण होते शेवटी ! संजय राजाराम राऊत आगे बढो.. हम तुम्हारे साथ है !”
आज @rautsanjay61 जी नी सिंधुदुर्ग जमिनी व्यवहारा बदल योग्य मुद्दा घेतला आहे..
बिलकुल मागे बघू नका ..
बोलत रहा ..
मग बघा कोणाचे वस्त्रहरण होते शेवटी ! संजय राजाराम राऊत आगे बढो.. हम तुम्हारे साथ है ! — Nitesh Rane (@NiteshNRane) September 28, 2026
नितेश राणेंच्या या पोस्टमुळे या कथित गैरव्यवहाराबाबत अजून सस्पेन्स वाढला असून यातून काय निष्पन्न होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संजय राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग परिसरातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या कृषी जमिनीच्या व्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या आरोपानुसार, शेतकरी नसलेल्या बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमधील धनिकांना या जमिनी विकण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत कायदेशीर निर्बंध असतानाही असे व्यवहार कसे झाले, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. या प्रकरणाची महसूल विभागाकडून चौकशी सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. या व्यवहारामागे कोकणातील राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोप करत राऊतांनी सरकारला थेट सवाल केले आहेत.
राऊतांनी या प्रकरणात जंगलतोडीचाही मुद्दा उपस्थित केला असून, स्थानिक शिवसैनिकांसोबत संबंधित भागाची पाहणी करणार असल्याचं म्हटलं आहे.
Maharashtra Drought: अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन