Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

धाराशिवमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळाव्यात संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करत भ्रष्टाचार, ईडी चौकशी आणि पक्षांतरावरून जोरदार हल्लाबोल केला.

  • By विवेक
Updated On: Jun 28, 2026 | 08:11 PM
धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • धाराशिवमधील सभेत संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर भ्रष्टाचार आणि पक्षांतरावरून जोरदार टीका केली.
  • 500 कोटींच्या प्लॉट खरेदी आणि ईडी चौकशीमुळे पक्षांतर केल्याचा दावा राऊत यांनी केला.
  • संबंधित आरोप हे राजकीय स्वरूपाचे असून त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही; ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथे आयोजित जाहीर सभेत भाजप आणि बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. बंडखोर खासदार oमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघातील या सभेत बोलताना त्यांनी जोरदार निशाणा साधला. यावेळी खासदार संजय राऊत यांनीही ओमराजेंचा चांगलाच समाचार घेतला.

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या या सहा खासदारांच्या मतदारसंघात दौऱ्यावर आहेत. या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे हे मेळावे घेत असून स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज (रविवार, 28 जून) धाराशिव येथे आयोजित सभेत संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर कडाडून टीका केली. तसेच, सुमारे 500 कोटी रुपयांचे प्लॉट खरेदीचे आरोपही त्यांनी केले.

“धाराशिवमध्ये सुमारे 500 कोटी रुपयांचे प्लॉट खरेदी?”

संजय राऊत यांनी आरोप केला की, ओमराजे निंबाळकर यांच्या संबंधित कंपनीने धाराशिवमध्ये सुमारे 500 कोटी रुपयांचे प्लॉट खरेदी केले असून, या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू असल्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच गरिबांच्या नावाने कथित बनावट खाती उघडणे, आर्थिक गैरव्यवहार आणि इतर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला. “चौकशीच्या भीतीनेच त्यांनी पक्ष सोडला,” असा दावा राऊत यांनी केला.

खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ… आता कपाळावरचा ‘गद्दार’ डाग कधी पुसणार? उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवर घणाघात

कैलास पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक

सभेत संजय राऊत यांनी आमदार कैलास पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक करत, “उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही,” अशी त्यांची भूमिका निष्ठेचे उदाहरण असल्याचे म्हटले. ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख करत त्यांनी, निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे भाषण केले होते, मात्र नंतर त्यांनी पक्षांतर केल्याची टीका केली. तसेच, ते “100 कोटींना विकले गेले” असा आरोपही त्यांनी केला.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

सभेत खासदार संजय राऊत यांनीही ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी निंबाळकर यांच्या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच विविध कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांचा उल्लेख करत ते शिंदे गटात गेले असल्याचा दावा केला.

‘शिंदे राम तर फडणवीस लक्ष्मण’; खासदार ज्योती वाघमारे यांच्या वक्तव्याने महायुतीत नव्या वादाची ठिणगी

राऊत यावेळी म्हणाले, “हा भामटा का गेला? कारण त्याने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. आता मला असेही वाटत आहे कि त्याच्या वडिलांचा जो खून झाला आहे. त्या खुनामागेदेखील वेगळं काहीतरी रहस्य आहे. हा गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट या त्याच्या कंपनीने 500 कोटींचे प्लॉट अक्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले आहेत. त्याची ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला. हा घाबरून शिंदे गटात गेला आहे. वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या गरिबांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. तेरणातील भंगार विकून त्याने पैसे खाल्ले, असे अनेक गुन्हे केले म्हणून या सगळ्यांची चौकशी लागली म्हणून हा डरपोक सोंगाड्या पक्ष सोडून गेला. 15-20 वर्ष एका सापाला दूध पाजले होते पण आता त्याचा फणा ठेचायची वेळ आली आहे,” असे राऊत म्हणाले.

Web Title: Sanjay raut allegations on omraje nimbalkar dharashiv rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Mp Omraje Nimbalkar
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
1

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
2

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा
3

Maharashtra Drought 2026: धाराशिवला दुष्काळाचा विळखा! आठही तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश, शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची अपेक्षा

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
4

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.