
जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २:०० ते २:३० वाजेच्या सुमारास आडगाव येथील स्थानिक रहिवासी व शेती व्यवसाय करणारे फिर्यादी कैलास माळोदे हे शेतातील काम आटोपून घराकडे जात होते. जुना इंग्लिश स्कूल रस्त्यावरील पुलाखालून जात असताना, दुचाकीवरून आलेला संशयित राहुल आंबेकर व त्याचा साथीदार तिथे आले. संशयित राहुल हा नाशिक रोड परिसरातील रहिवासी असून एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरीला आहे. तर फिर्यादी कैलास यांची पत्नीदेखील एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यात जुना वाद झाला होता, मात्र तो आपापसात मिटवण्यात आला होता.
जीवितहानी टळली
त्याच पूर्ववैमनस्यातून संशयिताने माळोदे यांना अडवून वाद घातला. शाब्दिक चकमकीचे रूपांतर झटापटीत झाले अन् वादावादी शिगेला पोहोचताच संशयिताने पिस्तूल काढून दोन राऊंड हवेत फायर केले व पसार झाले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संशयितावर यापूर्वी कोणताही पोलीस रेकॉर्ड नसून त्याने पिस्तूल कुठून आणले, याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून फरार संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत.
Ans: नाशिकमधील आडगाव परिसरात पुलाखाली.
Ans: नाही, दोन्ही गोळ्या हुकल्याने जीवितहानी टळली.
Ans: सहा महिन्यांपूर्वीच्या जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.