
Ambadas Danve
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय रणधुमाळी होत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक असो कि ज्ञानेश कुमार यांच्यावर राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी घेतलेला आक्रमक पवित्रा असो, राज्यात राजकीय घडामोडीना उधाण आल्याचे दिसत आहे. अश्यातच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूकीवरून महायुती होत असलेल्या धुसफुसीवरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
दानवे यांनी महायुतीतील घटकपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘भाजप त्यांना जे देईल तेच घ्यावं लागतं,’ अश्या शब्दांत त्यांनी शिंदेसेना-राष्ट्रवादीवर संधान सोडले आहे. याशिवाय CJP च्या तिरंगा रॅलीवरूनदेखील त्यांनी मोठे भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दानवे यांनी परभणीत बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीतील राजकीय घडामोडींसह अभिजीत दिपके यांच्या तिरंगा आंदोलनावरून सरकारला धारेवर धरलं.
Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ
महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर बोलताना दानवे यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले, “राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेला अजिबात मान नाही. त्यांना काही बोलण्याची मुभा नाही. त्यामुळे जे असेल ते घ्या, अशी वागणूक भाजप त्याना देते.”
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थखात्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही टीका केली. तटकरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित करत ते कधी भाजपमध्ये जातील, याची खात्री नसल्याचं दानवे म्हणाले.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या ‘लेहरा दो तिरंगा’ आंदोलनाचा संदर्भ देत दानवे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
‘भाजपने तिरंगा रॅली काढली तर ती देशभक्ती आणि अभिजीत दिपके यांनी तिरंगा घेऊन चला म्हटलं तर ते देशद्रोही का?’ असा सवाल त्यांनी केला. इंग्रजांच्या काळात भारतात तिरंगा फडकवणं गुन्हा मानलं जात होतं, तशीच परिस्थिती आज भाजपच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही दानवे यांनी केला. तिरंगा घेऊन जाणाऱ्या दिपके यांच्याबद्दल देशवासीयांना अभिमान वाटला पाहिजे, असंही ते म्हणाले.
Ans: राज्य सरकारमध्ये या दोन्ही पक्षांना फारसा मान नसल्याचा दावा करत भाजप जे देईल ते स्वीकारावं लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
Ans: भाजपने तिरंगा रॅली काढली तर ती देशभक्ती आणि अभिजीत दिपके यांनी तिरंगा घेऊन जाण्याचं आवाहन केलं तर ते देशद्रोह कसं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थखात्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी तटकरे यांच्या राजकीय भूमिकेवर टीका केली आणि ते कधी भाजपमध्ये जातील, याची खात्री नसल्याचं म्हटलं.