Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल’; जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा, CJP आंदोलनाला पुन्हा पाठिंबा

जंतर-मंतरवरील CJP आंदोलनाला भेट देताना संजय राऊत यांनी अभिजित दिपके यांच्यासोबत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा कायम असल्याचे सांगितले.

  • By विवेक
Updated On: Jul 21, 2026 | 03:39 PM
'जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल'; जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा, CJP आंदोलनाला पुन्हा पाठिंबा

'जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल'; जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा, CJP आंदोलनाला पुन्हा पाठिंबा

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊतांनी जंतर-मंतर आंदोलनस्थळी दिली भेट
  • अभिजित दिपके आणि आंदोलकांशी साधला संवाद
  • केंद्र सरकारवर जोरदार टीका, आंदोलनाला पाठिंबा कायम
 

राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी आंदोलनाचे प्रमुख चेहरा बनलेले अभिजित दिपकेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली.

‘उद्धव ठाकरेंनी राजकारणापलीकडे जाऊन पाठिंबा दिला’

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.” शिवाजी पार्कवरील सभा, तसेच पुणे आणि नागपूरमधील युवकांचा प्रतिसाद पाहता देशभरात या आंदोलनाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘लाठीचार्ज गरजेचा होता’; CJP आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसी कारवाईला दिले समर्थन

‘उद्या वेळ पडली तर आम्हीही आंदोलनात बसू’

सरकारला इशारा देताना राऊत म्हणाले, “जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या वेळ पडली तर आम्हीही इथे येऊन बसू. आम्ही जेलला किंवा गोळ्यांना घाबरत नाही. देशासाठी प्राण देणाऱ्यांमध्ये आम्हीही आहोत.” दिल्लीतील पोलिस कारवाईवर टीका करत त्यांनी ती घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप केला.

‘ही आग देशहिताची आहे’

राऊत यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचे समर्थन करत ही आग देशहिताची आणि राष्ट्रहिताची असल्याचे म्हटले. आंदोलनात देशभरातील युवक सहभागी होत असून त्यांचा आवाज दाबून प्रश्न सुटणार नाहीत, असे त्यांनी नमूद केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला.

Explainer: रस्त्यावर उतरलेले हजारो तरुण आणि बॅकफूटवर प्रशासन, CJPमुळे मोदी सरकारच्या अडचणी कशा वाढल्या?

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे चुकीचे

विद्यार्थ्यांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, “ही आपल्या देशाची मुलं आहेत. याच तरुणांनी काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणलं होतं. आज तेच युवक सरकारविरोधात आवाज उठवत आहेत आणि त्यांना दहशतवादी ठरवलं जात आहे.” तसेच, विद्यार्थी सध्या विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sanjay raut supports cjp jantar mantar protest delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP Protest
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Priya Bapat : ‘मी रागावली आहे, मी नाराज…’ प्रिया बापटने व्यक्त केला राग! सरकारला स्पष्ट शब्दात ठणकावले
1

Priya Bapat : ‘मी रागावली आहे, मी नाराज…’ प्रिया बापटने व्यक्त केला राग! सरकारला स्पष्ट शब्दात ठणकावले

‘लाठीचार्ज गरजेचा होता’; CJP आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसी कारवाईला दिले समर्थन
2

‘लाठीचार्ज गरजेचा होता’; CJP आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसी कारवाईला दिले समर्थन

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश
3

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांना सफदरजंगमधून मेदांता रुग्णालयात हलवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे आदेश

Explainer: रस्त्यावर उतरलेले हजारो तरुण आणि बॅकफूटवर प्रशासन, CJPमुळे मोदी सरकारच्या अडचणी कशा वाढल्या?
4

Explainer: रस्त्यावर उतरलेले हजारो तरुण आणि बॅकफूटवर प्रशासन, CJPमुळे मोदी सरकारच्या अडचणी कशा वाढल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.