sanjay shirsat target aditi tatkare and ajit pawar over ladki bahn yoajana Fund
मुंबई : महायुती सरकारकडून निवडणूकीपूर्वी जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सुरुवातीपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. निवडणुकीनंतर हप्त्यामध्ये 2100 रुपयांची वाढ न केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तर सत्ताधारी मंत्र्यांनी देखील त्यांच्या खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारकडून 100 दिवसांचा प्रशासकीय कामकाजाचा रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 5 सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांचे, अधिकाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली. नेत्यांच्या खात्यांनी केल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. मात्र यामुळे महायुतीमधील इतर मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी इतर खात्याचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यामुळे आदिती तटकरे यांच्या खात्याला नंबर आला असा गंभीर दावा शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले संजय शिरसाट?
आदिती तटकरे यांच्या खात्यात आमच्या खात्याचा निधी वर्ग केला. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे गेले. त्यानंतर त्यांचा विभाग नंबर एक वर आला. या कामगिरीत आमचा कुठेही उल्लेख नाही. कारण आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही. मग आमचा उल्लेख 100 दिवसांच्या उपक्रमामध्ये कसा होणार? त्यामुळे हे खातेच बंद करून टाका, हे चांगले आहे. एकीकडे माझे पाय तोडायचे आणि दुसरीकडे मला म्हणायचे की, पळ… तर हे शक्य होणार नाही. हा माझ्यावर होत असलेला अन्याय आहे, अशा शब्दांत मंत्री संजय शिरसाट यांनी निधीबाबत त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय राऊतांची टीका
यावर आता विरोधकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती अशी टीका योजनेवरुन केली आहे. राऊत म्हणाले की, लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही रडत आहात. आधी कसे हसत होतात मत पाहिजे म्हणून खिशातला पैसा वळवला का? सरकारी पैसा आहे याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींना देखील फसवत आहात. चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती आणि आता ही पाकीट मारी करणं सोपं नाही. अजित पवार एक अर्थमंत्री म्हणून खामक्या माणूस आहे. अजित पवारांना हे शकुनी म्हणतात. अर्थ खात्याला आणि देशाला आर्थिक शिस्त लावणे याला जर शकुनी म्हणत असाल तर सध्याची तुम्ही लूटमार करून सत्तेवर आलेले आहेत त्याला काय म्हणायचे दुर्योधन म्हणायचे का? अशी टीका संजय राऊत यांनी केली.