Photo Credit- Social Media राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत करा; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींच्या विधानाने खळबळ
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर तीव्र शब्दांत टीका करत, त्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची घोषणा केली आहे. काही दिसांपूर्वी राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीसंदर्भात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शंकराचार्यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. यासाठी त्यांनी राहुल गांधींना औपचारिक पत्रही पाठवले होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही या पत्राला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी कठोर भूमिका घेत, राहुल गांधींना हिंदू मानू नये, असे खळबळजनक विधान केलं आहे. त्यामुळे आता या वक्तव्यामुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडत, संसदेत हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. शंकराचार्य म्हणाले की, “राहुल गांधी यांनी संसदेत जाहीरपणे सांगितले की, ‘मी मनुस्मृतीवर विश्वास ठेवत नाही, मी फक्त संविधानावर विश्वास ठेवतो.'”शंकराचार्य यांच्या मते, हिंदू धर्म मानणारा प्रत्येक व्यक्ती मनुस्मृतीशी निगडित असतो. “मनुस्मृती हा आमचा धर्मग्रंथ आहे, त्यामुळे जो कोणी त्यावर विश्वास ठेवत नाही, त्याला हिंदू म्हणता येणार नाही,” असेही ते म्हणाले. या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या विधानाच्या अनुषंगाने धार्मिक आणि राजकीय पातळीवर वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला अजितदादांची दांडी; समारोपाला तरी उपस्थित राहणार का? चर्चांना उधाण
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक गंभीर भूमिका घेत सर्व पंडित आणि हिंदू समाजाला आवाहन केले आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी कोणतीही पूजा करू नये आणि त्यांच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये. शंकराचार्य म्हणाले, “जो व्यक्ती धार्मिक शास्त्र आणि तत्त्वांवर विश्वास ठेवत नाही, त्याला हिंदू मानता येणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “राहुल गांधींसारख्या लोकांमुळेच धर्माचे नुकसान होण्याची भीती निर्माण होते.” या विधानांमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, धार्मिक आणि सामाजिक वर्तुळातही विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीवर टीका करत सावरकरांच्या विचारांचा संदर्भ दिला होता. त्यांनी उजव्या हातात संविधान आणि डाव्या हातात मनुस्मृतीची प्रत घेऊन वक्तव्य करत सांगितले होते की, “सावरकरांनी त्यांच्या लेखनात स्पष्टपणे म्हटले आहे की भारतीय संविधानातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात काहीही ‘भारतीय’ नाही.”
रेल्वेचे खास गिफ्ट, पुण्यातून धावणार ‘ही’ नवीन एक्स्प्रेस ट्रेन : पहा वेळापत्रक
राहुल गांधी पुढे म्हणाले होते की, “सावरकरांच्या मते, मनुस्मृती हा वेदांनंतर सर्वात आदरणीय धर्मग्रंथ असून, तो हिंदू राष्ट्रासाठी मार्गदर्शक आहे. प्राचीन काळापासून ही संहिता आपल्या संस्कृती, परंपरा, विचार आणि वर्तनाचा पाया राहिली आहे. त्यांच्या मते, मनुस्मृतीतच आपल्या राष्ट्राचा आध्यात्मिक आणि दैवी प्रवास संहिताबद्ध स्वरूपात मांडलेला आहे, आणि आजही मनुस्मृतीचाच विचार कायद्यासारखा केला जातो.” या विधानांमुळे संसद आणि देशभरात मोठा वाद निर्माण झाला. राहुल गांधींनी सावरकरांच्या विचारांवर आधारित टीका करत संविधानावरील विश्वास अधोरेखित केला, तर काहींनी त्यांच्या विधानांचा अर्थ हिंदू धर्माच्या मूलतत्त्वांना विरोधी असल्याचा घेतला.