Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara District bank  Election 2026:शिवसेना-राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार धक्का! सातारा जिल्हा बँकेत भाजपचा पराभव 

Satara District Bank Chairman Election 2026: काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हा बँकेवर यापूर्वी दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे वर्चस्व होते. पण साताऱ्याच्या राजकारणात अजित पवार यांचे वर्चस्व वाढल्यानंतर उंडाळकर यांचे वर्चस्व संपले आणि बँकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2026 | 03:27 PM
Satara District Bank Chairman Election 2026, Udaysinh Patil Undalkar Satara Bank

Satara District Bank Chairman Election 2026, Udaysinh Patil Undalkar Satara Bank

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची बिनविरोध निवड
  • उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध वर्णी
  • मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या रणनीतीमुळे मंत्री जयकुमार गोरे व भाजपला मोठा धक्का
Satara District bank Chairman Election 2026: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजपकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. जिल्ह बँकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील उंडाळकर आणि शिंदे गटाचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी बँकेवर अध्यक्ष बसवल्याने स्थानिक स्तरावरील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मंत्री जयकुमार गोरेंचा पराभव

पण भाजपला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी भाजपला बाजूला ठेवत मंत्री जयकुमार गोरे यांना चितपट केल आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी उदयसिंह पाटील यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. या दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा बँकेच्या सत्तास्थापनेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे संचालक निवडून आल्याने अध्यक्षपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने जाणार, याबाबत उत्सुकता होती.

सोनिया गांधींचे पुस्तक फाडताच काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेला थेट दिले ‘हे’ आव्हान

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांपैकी भाजपचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे ४ संचालक निवडून आले होते. बँकेचे संचालक आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी चर्चाही सुरू झाली होती. तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाणार असल्याची भूमिका मांडली.

विलासकाका उंडाळकरांच्या वारशाला पुन्हा संधी

काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हा बँकेवर यापूर्वी दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचे वर्चस्व होते. पण साताऱ्याच्या राजकारणात अजित पवार यांचे वर्चस्व वाढल्यानंतर उंडाळकर यांचे वर्चस्व संपले आणि बँकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यानंतर अलीकडेच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते उदयसिंह पाटील बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले. उदयसिंह पाटील हे सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य असून, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात.

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या

दीपक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन

जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले दीपक चव्हाण हे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक मानले जातात. त्यांनी फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही काम केले आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने दीपक चव्हाण यांना सहकार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळाली असून, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

    Ans: सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे.

  • Que: भाजप सर्वाधिक संचालक असूनही सत्तेबाहेर का राहिला?

    Ans: बँकेच्या २१ संचालकांपैकी भाजपचे सर्वाधिक ९ संचालक निवडून आले होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे ४ संचालक एकत्र आल्याने त्यांचे १२ जणांचे बहुमत झाले आणि भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले.

  • Que: या निवडणुकीत कोणत्या नेत्यांची रणनीती महत्त्वाची ठरली?

    Ans: पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक पातळीवर सूत्रे हलवत भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Satara district bank chairman election 2026 udaysinh patil undalkar deepak chavan elected as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara News

संबंधित बातम्या

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू
1

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद
3

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद

Satara News : पाणीबचतीचे आदेश कागदावरच; धोम उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
4

Satara News : पाणीबचतीचे आदेश कागदावरच; धोम उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.