सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्याने काँग्रेस आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
Congress reaction on Sonia Gandhi book controversy : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा दावा शिंदेसेनेने केला आहे. यामुळे पत्रकार परिषद घेत त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्या आहेत. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ या पुस्तकाला जोरदार प्रतिसाद मिळत असून सर्वत्र या पुस्तकाची चर्चा आहे. मात्र यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा दावा करत या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “सूर्यावर थुंकल्यावर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही. ही गद्दार गँग जी आहे, त्यांनी शिंदे सेनेच्या माध्यमातून राजकारणाचं विकृतीकरण केलय. त्यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा महाराष्ट्राला दिली आहे.”
शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो
पुढे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ही शिंदे शिवसेनेची मानसिक दिवाळखोरी आहे. ही संस्कृती नव्हतीच, विकृती होती. विकृतीचा टेंभा ते मिरवतायत. या लोकांकडून संस्कृतपणाची अपेक्षा करणे हेच व्यर्थ आहे. सोनिया गांधी यांनी एक आठवणीचा ठेवा देशासोबत शेअर केलाय. पुस्तकाचा खप प्रचंड होतोय. वर्ल्ड रेकॉर्ड होतोय. या पुस्तकाला फाडणं म्हणजे सूर्यावर पडदा टाकण्यासारखं आहे.”
हर्षवर्धन सपकाळ हे शिंदेसेनेला आव्हान देत म्हणाले की, मला त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. एकदा त्यांनी ते पु्स्तक वाचावं. त्यानंतर त्यावर चर्चा करावी, वाद-प्रतिवाद करावेत. त्यांना इंग्रजी येत नसेल. सभ्यता, संस्कृती समजून घ्यायची नसेल, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. शिंदे शिवसेनेमध्ये एवढी हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे शिवसेने विरोधात जे निर्णय घेतले, त्या निर्णयाचे जीआर फाडून दाखवावेत,” असे थेट आव्हान सपकाळांनी दिले आहे.
Ans: ‘Belonging: A Journey of Love’ या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे. या पार्श्वभूमीवर पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ans: सपकाळ यांनी पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या कृतीला शिंदेसेनेची ‘मानसिक दिवाळखोरी’ असल्याचे म्हणत तीव्र शब्दांत निषेध केला. इतिहास कोणीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी तो पुसला जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
Ans: पुस्तक आधी वाचावे आणि त्यानंतर त्यावर चर्चा, वाद-प्रतिवाद करावा, असे आव्हान सपकाळ यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात घेतलेल्या निर्णयांचे जीआर फाडून दाखवावेत, असेही त्यांनी म्हटले.






